नॉर्वे

नॉर्वेचे राजतंत्र (नॉर्वेजियन: Norge) हा उत्तर युरोपातील एक उत्तरी देश आहे. स्कँडिनेव्हियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात वसलेल्या नॉर्वेच्या सीमेचा मोठा हिस्सा स्वीडन देशासोबत आहे तर फिनलंड व रशिया देश नॉर्वेच्या अतिउत्तर सीमेवर आहेत. पश्चिम व दक्षिणेस नॉर्वेजियन समुद्र व उत्तर समुद्र आहेत. स्वालबार्ड व यान मायेन हे आर्क्टिक महासागरामधील द्वीपसमूह नॉर्वेच्या अधिपत्याखाली आहेत. ओस्लो ही नॉर्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. सध्या नॉर्वेमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व सांसदीय लोकशाही आहे. हाराल्ड पाचवा हे येथील विद्यमान राजे आहेत.

अत्यंत विकसित व समृद्ध असलेला नॉर्वे देश दरडोई उत्पन्नामध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. नॉर्वे हा जगातील पाचव्या क्रमांकाचा खनिज तेल उत्पादक आहे. नॉर्वेचा मानवी विकास निर्देशांक जगात सर्वाधिक आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :ओस्लो
अधिकृत भाषा :नॉर्वेजियन, सामी
राष्ट्रीय चलन :नॉर्वेजियन क्रोन (NOK)

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*