डोंबिवलीचा ऐतिहासिक वारसा

तुर्भे बंदराजवळील माहुल गावी शिलाहार राजा हरिपालदेव ह्याचा शके १०७५ (सन ११५३) मधील एक लेख सापडला असून त्यात “डोंबिल वाटिका ” असा उल्लेख आहे.

डोंबिवलीच्या पूर्वेस मानपाडा रस्त्यावर गावदेवी मंदिराच्या बाजूला एक ऐतिहासिक शिलालेख आहे तो इसवी सन १३९६ मधील आहे. त्यात श्री आलुनाकु या नावाचा राजा ठाण्यावर राज्य करत होता व त्याने केलेले दानपत्र नमूद आहे. याने आपला सेवक जसवंत दळवै याला आठगावामधील (अष्टागर ) डोंबिवली नावाचे गाव दान केले आहे. असा शिलालेखात उल्लेख आहे.

अणजूरच्या नाईक घराण्याच्या इतिहासात व इतर पत्रव्यवहारात व दीक्षित भटजी यांना दिलेल्या बक्षीस पत्रातून “डोंबोली” असा उल्लेख सन १७३० सालचा असल्याचे आढळले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*