फिजी

फिजीचे प्रजासत्ताक (इंग्लिश: Republic of Fiji; फिजीयन: Matanitu ko Viti; फिजी हिंदी: फ़िजी गणराज्य) हा दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक द्वीप-देश आहे. हा देश सुमारे ३३२ बेटे असलेल्या द्वीपसमूहाचा बनला असून ह्यांपैकी ११० बेटांवर लोकवस्ती आहे. व्हिटी लेवू व व्हानुआ लेवू ही येथील प्रमुख बेटे आहेत. फिजीची राजधानी सुवा व्हिटी लेवू बेटावरच वसली आहे व ७५ टक्के रहिवासी सुवा महानगर परिसरामध्ये वास्तव्यास आहेत.

फिजी हा ओशनिया खंडामधील सर्वात विकसित देशांपैकी एक मानला जातो. २०१२ साली फिजीची लोकसंख्या ८.६८ लाख होती ज्यापैकी ३८ टक्के लोक भारतीय वंशाचे आहेत. येथील राजकारण, समाजजीवन इत्यादींवर भारतीय संस्कृतीचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :सुवा
अधिकृत भाषा :इंग्लिश, फिजीयन, फिजी हिंदी
स्वातंत्र्य दिवस :१० ऑक्टोबर १९७० (युनायटेड किंग्डमपासून)
राष्ट्रीय चलन :फिजीयन डॉलर

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*