चीन

चीन (इंग्रजी: China/ चायना; नवी चिनी चित्रलिपी: 中国; जुनी चिनी चित्रलिपी: 中國; फीनयीन: Zhōngguó; उच्चार: चाँऽऽग्-कुओऽ; अर्थ: जगाच्या मध्यभागी वसलेला देश), अधिकृ्त नाव:- चीनचे जनतेचे प्रजासत्ताक (नवी चिनी चित्रलिपी: 中华人民共和国; जुनी चिनी चित्रलिपी: 中華人民共和國; फीनयीन: Zhōnghuá Rénmín Gònghéguó; उच्चार: चाँऽऽग्-हुआऽ रऽन्-मीऽन् कोंग्-हऽ-कुओऽ) हा आशियातला, जगातला सर्वांत जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. बौद्ध धर्म हा चीनचा प्रमुख धर्म असून देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये ९१% (१२२ कोटी) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे

चीनचे क्षेत्रफळ सुमारे ९६ लाख चौरस किलोमीटर आहे. भूप्रदेशाच्या आकारानुसार चीन जगातला दुसरा सर्वात मोठा देश आहे.चीनचा विस्तारित भूप्रदेश वैविध्यपूर्ण आहे. उत्तर आणि उत्तरपुर्वेला मंगोलिया आणि मध्यआशियानजिक गोबी आणि तलमाकन वाळवंटे आहेत. तर नैऋत्य आशियालगतच्या दक्षिणेकडच्या पाणथळ भूप्रदेशात कटिबंधीय अरण्ये आहेत. चीनचा पश्चिमेकडील भूभाग हा खडबडीत आणि उंचावलेला आहे. हिमालय, काराकोरम, पामीर आणि थ्येन शान पर्वतरांगा याच भागात आहेत. तिबेटच्या पठारावरून निघणाऱ्या यांगत्से आणि पीत नदी या दोन पूर्ववाहिनी नद्या चीनमधील मोठ्या नद्या आहेत.

भारताचे चीनशी प्राचीन संबंध असल्याचे पुरावे आहेत. बलबाहु (अर्निको) ने बिजींग शहराच्या आखणीत बाराव्या शतकाच्या सुमारास मोठे योगदान दिले आहे. आजही बलबाहुचा पुतळा या शहरात आहे. बलबाहु अर्निको या नावाने चीन मध्ये प्रसिद्ध होता.

चीन हा मोठ्या क्षेत्रफळाचा देश असल्यामुळे याच्या सीमा अनेक देशांशी संलग्न आहेत. चीनच्या उत्तरेला मंगोलिया व ईशान्येला रशिया आहे. पुर्वेला चिनी समुद्र आहे. व् नैऋत्येला भारत आहे.

बौद्ध धर्म हा चीनचा प्रमुख धर्म असून तो सर्वात संघटीत धर्म आहे. प्राचीन चिनी धर्म व बौद्ध धर्माचे अनुयायी येथे मोठ्या प्रमाणात राहतात. चीनच्या एकूण लोकसंख्येमध्ये तब्बल ९१% (१२२ कोटी) लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे, आणि ही बौद्धांची संख्या ही भारताच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. तसेच जगभरातील १०३ कोटी हिंदू धर्मीयांहून खूपच अधिक आहे. चीनमध्ये ताओवादी कन्फ्युशियसवादी हे सुद्धा बौद्ध धर्माचे पालन करतात. चीनमध्ये ख्रिश्चन लोकसंख्या ही २.५% (३.३ कोटी) आहे तर इस्लाम धर्माची लोकसंख्या ही अवघी १.५ % (२ कोटी) आहे. उरवर्तीत ५% लोकसंख्या ही अन्य धर्मिय व निधर्मींची आहे. चीन मध्ये बौद्ध मठ आणि विहार यांची संख्या जवळजवळ ३५,००० हून अधिक आहे आणि बौद्ध भिक्खू व भिक्खूनींची संख्या अडीच लाखाहून अधिक आहे. जगातील सर्वात मोठे निवासी बौद्ध विद्यालय लारूंग गार बुद्धिस्ट एकेडमी येथे असून बौद्ध धर्म व तत्त्वज्ञानाचे शिक्षण घेण्यासाठी दरवर्षी देश-विदेशांतून लाखों विद्यार्थी येतात. १५४ मीटर उंच असलेला ‘जगातील सर्वाधिक उंच पॅगोडा’ (विहार) याच देशात आहे. स्प्रिंग टेंपल बुद्ध ही जगातील सर्वात उंच मुर्ती चीनमध्ये आहे आणि या मुर्तीची उंची एकूण उंची १५२ मीटर आहे. लेशान बुद्ध ही जगातील दगडाची सर्वात मोठी व उंच मुर्ती आहे याच देशात आहे. तसेच जगातील आकाराने सर्वात मोठी असलेली प्रचंड मोठी मुर्ती चीन मध्येच निर्मिली असून २ किलो मीटर डोंगर चिरून त्यात निद्रावस्थेतील भव्य बुद्ध मुर्ती साकारलेली आहे.

१९८६ साली चीनने सर्व मुलांसाठी नऊ वर्षीय शिक्षण सक्तीचे केले. २००७ साली चीनमध्ये ३,९६,५६७ प्राथमिक शाळा, ९४,११६ माध्यमिक शाळा, व २,२३६ उच्च विद्यालये होती. फेब्रुवारी २००६ मध्ये चीनी सरकारने सर्व विद्यार्थांचे शिक्षण संपूर्णपणे मोफत केले, विद्यार्थ्यांना पुस्तके मोफत मिळू लागली.
२००७ साली चीनमधील १५ वर्षावरील ९३.३% जनता साक्षर होती. २००० साली १५ ते २४ या वयोगटातील ९८.९% जनता साक्षर होती.

चीनी संस्कृती सर्वात जूनी संस्कृती समजली जाते कारण त्याला ३००० वर्षापूर्वीचा इतिहास आहे. बौद्ध धर्म हा चिनी संस्कृतीचे महत्त्वपूर्ण अंग बनला आहे. ताओ, कन्फ्युझिशियस सारखे चिनी लोक धर्म सुद्धा चिनी संस्कृतीचे अविभाज्य घटक आहेत.

लष्कर
चीनचे लष्करी बळ मोठ्या प्रमाणात वाढते आहे. सव्वा कोटी सैनिकांची फौज, सात हजार पाचशे तोफा आणि सहा हजार सातशे रणगाडे असे स्वरूप आहे.

अंतराळ युद्ध
लष्करी प्रयोजनाच्या ‘टिअ‍ॅनलिअ‍ॅन’ उपग्रहाचा समावेश.
उपग्रहावर आधारित नौकानयनासाठी चीन स्वतंत्र व्यवस्था
नौकानयनासाठी अमेरिकेची जीपीएस, रशियाची ग्लोनास व स्वतची प्रादेशिक बिडोऊ – १ यंत्रणा

क्षेपणास्त्रे
एक हजार पाचशे ते १३ हजार किलोमीटपर्यंत मारा करणारी क्षेपणास्त्रे.
जहाजविरोधी व जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे
डीएफ-३१, डी एफ-३१ ए या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांद्वारे अमेरिकेतील प्रमुख शहरे टप्प्यात. ही क्षेपणास्त्रे डागणारी संपूर्ण फिरती यंत्रणा विकसित
क्रूझ क्षेपणास्त्रांचा हवेतून दिवसा व रात्रीही मारा करता यावा म्हणून अतिप्रगत लढाऊ विमानांचा ताफा तैनात.
पाणबुडय़ांवरून सात हजार २०० किलोमीटर अंतरावर अचूकपणे डागता येतील अशा ‘जेएन-२’ या क्षेपणास्त्रांचा विकास.

हवाई दल
चीनच्या हवाई दल व नौदलाकडे २३०० विमानांचा ताफा आहे.
त्यामध्ये १६५५ लढाऊ, ६४५ बॉम्बफेकी तर ४५० लष्करी वाहतुकीच्या विमानांचा समावेश.
या शिवाय, १४५० जुन्या लढाऊ व बॉम्बफेकी विमानांचा ताफा.
हवाई दलाकडील १०० हून अधिक विमाने टेहळणी व हवाई हल्ल्यांची पूर्वसूचना या कार्यासाठी वापरली जातात.

नौदल
आण्विक शक्तीवरील पाणबुडय़ा, विनाशिका, पाणसुरूंगांचा वेध घेणारी व ते पेरणारी जहाजे, अतिवेगवान लढाऊ जहाजे आणि अण्वस्त्रांसह इतरही क्षेपणास्त्रांनी सज्ज असणारा पेट्रोल क्राप्टचा ताफा चीन कडे आहे.
२७ विनाशिका
४८ लढाऊ जहाजे
अण्वस्त्र व इतर क्षेपणास्त्रांचा मारा करू शकणाऱ्या ६० युद्धनौका
२७ मालवाहू व विमानवाहू जहाजे असा ताफा आहे.
दहा हजार टनाची हॉस्पिटल नौकेसह सागरी युद्धभूमीवर वैद्यकीय उपचारांची सुविधा

राजधानी : बीजिंग
सर्वात मोठे शहर : शांघाय
अधिकृत भाषा : चिनी भाषा
स्वातंत्र्य दिवस : ऒक्टोबर १, १९४९
राष्ट्रीय चलन : रेन्मिन्बी (CNY)

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*