यवतमाळ जिल्हा

यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. कापूस म्हणजेच ‘पांढरे सोने’ मोठ्या प्रमाणावर पिकवणारा जिल्हा अशी या जिल्ह्याची ख्याती आहे. बालाघाट डोंगर रांगांपासून तयार झालेला हा जिल्हा डोंगराळ मध्यम पठाराचा जिल्हा म्हणून ओळखला […]

परभणी जिल्हा

परभणी परिसराशी अनेक पौराणिक संदर्भ जुळलेले आहेत. संत जनाबाईंच्या विठ्ठलभक्तीचा स्पर्श या जिल्ह्याला झालेला आहे. जिंतूरसारखे जैन भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ठिकाण या जिल्ह्यात आहे.शिवाय दक्षिण गंगेचा (गोदावरीचा) काठ लाभलेल्या या जिल्ह्यातून मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यरत […]

नाशिक जिल्हा

धार्मिकदृष्ट्या महाराष्ट्रात प्रसिध्द असणार्‍या नाशिक जिल्ह्याने औद्योगिकदृष्ट्याही मोठी प्रगती साधली आहे. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र असा सिंहस्थ पर्वातील कुंभमेळा येथे भरतो. पुराण काळात श्री प्रभु रामचंद्र, लक्ष्मण व सीतामाई यांच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी […]

नागपूर जिल्हा

नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी स्थित असून भारताचा शून्य (0) मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. नागपूर देशाच्या मध्यवर्ती स्थानावर असल्याने रस्ते, विमान व रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. देशातील दुसर्‍या […]

नांदेड जिल्हा

नांदेड हे नाव श्रीशंकराच्या नंदी या वाहनाच्या नावावरुन उगम पावले असल्याचे सांगण्यात येते तर नऊ ऋषींचे निवासास्थान म्हणजेच ‘नवदंडी’ हे नांदेडचे पूर्वाश्रमीचे नाव होते असे म्हटले जाते. ऐतिहासिक महत्व लाभलेला नांदेड जिल्हा श्री रेणुकामातेचे मंदिर […]

ठाणे जिल्हा

ठाणे जिल्हा अनेकविध वैशिष्ट्यांनी समृध्द असा जिल्हा आहे. ठाण्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र असल्याने या जिल्ह्याला सुंदर किनारा लाभला आहे. पूर्वेला सह्याद्रिची रांग असल्याने हा जिल्हा जंगल, डोंगर-कपारींनी समृध्द आहे. बहुविध वैशिष्ठ्ये लाभलेला कोकण सुध्दा ठाणे […]

कोल्हापूर जिल्हा

ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती,मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे. येथील मसालेदार पाककृतीही तिखटपणासाठी भारतभर प्रसिद्ध आहेत. कोल्हापूर हे महाराष्ट्रातील सहकारी चळवळीचे माहेरघरच मानले जाते. या जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा […]

अहमदनगर जिल्हा

जी ईश्‍वरनिर्मित असल्याने चिरंतन टिकून आहे, ती ज्ञानेश्‍वरी. मराठी भाषेतील सर्वांत मोठा प्राचीन असा ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी अहमदनगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासे येथे लिहिला. शिर्डी येथील प्रसिध्द साईबाबा मंदिर याच जिल्ह्यात कोपरगाव तालुक्यात आहे. […]

सांगली जिल्हा

कृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. सुरुवातीला सातारा जिल्ह्याचा भाग असणारा सांगली जिल्हा दिनांक १ ऑगस्ट,१९४९पासून दक्षिण सातारा म्हणून ओळखला जाऊ लागला, […]

रत्नागिरी जिल्हा

निर्मळ, स्वच्छ, सुंदर समुद्र किनारे व हापूस आंबे, काजू, नारळी, पोफळीच्या बागा यांनी संपन्न असलेला जिल्हा म्हणजे रत्नागिरी. या जिल्हयाला निसर्गाने जणू काही अप्रतिम सौंदर्यच बहाल केले आहे. म्हणून हा जिल्हा पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्वाचा जिल्हा […]

1 2 3 4