सातवाहनकालीन कर्‍हाड

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कर्‍हाड हे प्राचीन शहर सातवाहनकालीन आहे. सातवाहनकालीन वसाहत, बौध्द लेण्या, कुरुवंशाची नाणी येथील उत्खनात आढळल्या आहेत. […]

चीनमधील पिंग यो शहर

चीनमधील प्राचीन पिंग यो शहर हान काळातील वास्तुरचनेसाठी प्रसिद्ध आहे हे शहर १४व्या शतकातील शहररचनेच्या उत्कष्ट नमुना आहे. मिंग आणि क्विंग राजांच्या काळात हे शहर भरभराटीला आले.

यवतमाळचे शारदाश्रम पांडुलिपी संशोधन केंद्र

महाराष्ट्रातील यवतमाळ शहरात इतिहास संशोधक डॉ. वाय देशपांडे यांनी सन १९३२ मध्ये शारदाश्रमाची स्थापना केली. पांडुलिपीचे ट्रेसिंग व प्रकाशन या इतिहास संशोधन केंद्राव्दारे करण्यात आले आहे.  

मणिपूरमधील ऐतिहासिक शहर – मोहरा

मणिपूर राज्यातील इम्फाळ शहरापासून ४५ कि. मी. अंतरावर मोहरा हे ठिकाण आहे. येथे आझाद हिंद सेनेचे स्मारक असून, याच ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा तिरंगा फडकविला होता.

इंग्लंडमधील विंडसर किल्ला

विंडसर किल्ला हा इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीच्या रहिवासामुळे प्रसिध्द आहे. बर्कशायर येथे असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम १५ व्या शतकात राजा हेन्री प्रथमच्या काळात झाले आहे. थेम्स नदीच्या पश्चिम तीरावर असलेल्या या शहराच्या ईशान्य टोंकास उंच टेंकडीवर […]

दौडनगर किल्ला

दौडनगर बिहार राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील पुरातन किल्ला आहे. इ. स. १७ व्या शतकात दाऊद खान याने या किल्ल्याचे बांधकाम केले आहे. राज्यातील पुरातन सांस्कृतिक वारसा म्हणून हा किल्ला प्रसिध्द आहे.

हरियाणातील पुरातन सूरजकुंड

  हरियाणा राज्यातील फरिदाबाद जिल्ह्यात पुरातन सूरजकुंड आहे. येथे प्रसिध्द शिल्प मेळावा भरतो. दरवर्षी १ ते १५ फेब्रुवारी दरम्यान अयोजित या मेळाव्यात देश-विदेशातील नागरिकांची रेलचेल असते.      

1 2 3 11