गडचिरोली जिल्ह्यातील लोकजीवन

गडचिरोली जिल्ह्याचा बराचसा भाग जंगलांनी व्यापला असल्याने येथील आदिवासींची संख्या तुलनेने जास्त आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो. आदिवासींच्या घराला ‘टोळा’ असे म्हणतात. गोंड वस्तीच्या गावांमध्ये गावाच्या मध्यभागी ‘युवागृह’ असते. याला ‘गोटूल’ […]

कोल्हापूर जिल्ह्यातील लोकजीवन

कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा, लिंगायत, जैन व धनगर लोक मोठ्या संख्येने राहतात. ग्रामीण व शहरी लोकसंख्येचे प्रमाण अनुक्रमे सुमारे ७०% व ३०% आहे. यावरून जिल्ह्याचे ग्रामीण स्वरूप लक्षात येते. हा जिल्हा सधन मानला जातो. कोल्हापुरी […]

सांगली जिल्ह्यातील लोकजीवन

जिल्ह्यात जागोजागी भिन्नभिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलूस, वाळवा, मिरज तालुक्यांतील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापूर हे डोंगरी तालुके आहेत. एका […]

रत्नागिरी जिल्ह्यातील लोकजीवन

रत्नागिरीची लोकसंस्कृती स्वभावतः कोंकणी असून जिल्ह्याचा अभिमानास्पद इतिहासाचे प्रतिबिंब येथील संस्कृतीत दिसून येते. अनेक शैक्षणिक संस्था आणि उद्योगांचे माहेरघर असलेले रत्नागिरी, व्यापार आणि निवासासाठी सोयीचे ठिकाण मानले जाते.

रायगड जिल्ह्यातील लोकजीवन

रायगड जिल्ह्यात आगरी, समाज तसेच कातकरी, ठाकर, वारली या आदिवासी जमातींचे लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. जिल्ह्याला भरपूर लांबीचा सागर किनारा लाभला असल्याने मासेमारी करणार्‍या कोळी जमातींची वस्तीही देखील मोठ्या प्रमाणावर आहे. भात हे येथील मुख्य […]

पुणे जिल्ह्यातील लोकजीवन

पुणे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेले पुणे शहर हे संस्कृतीचा अर्क मानला जातो. पुणेरी पगडी, पुणेरी भाषा, पुणेरी मिसळ, पुरण पोळी, आळूची वडी; इत्यादी वैशिष्टयांसाठी पुणे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात जत्रा, उरूस या माध्यमांतून संस्कृतीचे […]

परभणी जिल्ह्यातील लोकजीवन

शैक्षणिकदृष्ट्या परभणी जिल्हा हा नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अखत्यारीत येत असुन, या विद्यापीठा अंतर्गत जिल्ह्यात एकूण २६ विविध प्रकारची महाविद्यालये आहेत. तसंच १९७२ मध्ये स्थापन झालेल्या मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मुख्यालय परभणी येथे आहे. […]

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकजीवन

जिल्ह्याची सीमा कर्नाटकला जोडलेली असल्यामुळे व मराठवाड्यास आंध्रप्रदेश जवळ असल्याने या जिल्ह्यात मराठीसह कन्नड व तेलगू या भाषाही बोलल्या जातात. मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या या जिल्ह्याला धार्मिक स्थळांमुळे वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. ३० […]

नाशिक जिल्ह्यातील लोकजीवन

नाशिक जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येशी असलेले आदिवासी जमातींचे प्रमाण लक्षात घेता नाशिक जिल्ह्याचा राज्यात तिसरा क्रमांक लागतो. महादेव कोळी, वारली, पारधी, भिल्लं, ठाकर या आदिम जमाती या जिल्ह्यात राहतात. कळवण, सुरगाणा, सटाणा, दिंडोरी, पेठ व इगतपुरी […]

नंदुरबार जिल्ह्यातील लोकजीवन

नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर भागातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये आदिवासी जमाती वास्तव्यास असून येथील लोकसंख्येची घनता कमी आहे. या भागातील वनांत भिल्ल, पारधी व गोमित या आदिवासी जमाती मोठ्या संख्येने राहतात. त्याचबरोबर गावीत, कोकणा, पावरे, मावची, धनका या […]

1 2 3 4 5