सातारा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

सातारा जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान जिल्हा आहे. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हे दोन्ही हंगामात घेतले जाते. येथील खरीप हंगामातील जोंधळा ज्वारी व रब्बी हंगामातील शाळू ज्वारी प्रसिद्ध आहे. कृष्णाकाठची वांगी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. […]

वाशिम जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

वाशिम जिल्ह्याचा बराचसा भाग हा डोंगराळ व पठारी असून वनच्छादीत आहे. नद्या व विहिंरीद्वारे केल्या जाणार्‍या जलसिंचनाचे प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. जिल्ह्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ४,०१,००० हेक्टर्स इतके आहे. यापैकी जिरायत क्षेत्र २,८४,००० इतके आहे, […]

वर्धा जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

वर्धा जिल्हा कृषीप्रधान असल्याने अनेक प्रकारची पिके या जिल्ह्यात घेतली जातात. ज्वारी, कापूस, मूग, तूर, तांदूळ, भुईमूग आदी पिके खरीप हंगामात, तर गहू, हरभरा ही पिके रब्बी हंगामात जिल्ह्यात घेतली जातात. सोयाबीन, तूर ही जिल्ह्यातील […]

लातूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

कृषिप्रधान असलेल्या लातूर जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून ऊसाखालचे क्षेत्रदेखील लक्षणीय आहे. कन्हार जिल्ह्यातील नद्यांच्या खोर्‍यांमध्ये अतिशय सुपीक माती आढळते. काही भागात हलकी,मध्यम स्वरुपाची तर काही भागात भरडी जमीन आढळते.औसा येथील द्राक्षे प्रसिद्ध आहेत. […]

यवतमाळ जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

यवतमाळ जिल्हा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा कापूस उत्पादक जिल्हा आहे. वर्धा व पैनगंगेच्या खोर्‍यातील काळ्या कसदार जमिनीमुळे येथे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. जिल्ह्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ८,४७,६०० हेक्टर्स इतके आहे.ज्वारी हे जिल्ह्‌यातील प्रमुख पीक असून […]

मुंबई जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन्ही जिल्हे संपूर्ण नागरीकरण झालेले असल्याकारणाने येथे शेतीयोग्य जमीन नाही. भारतातील ऊस ही मुंबईची देणगी असे म्हणता येईल. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात ऊसाची लागवड चालू झालेली नव्हती. साखर खास […]

नागपूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

या जिल्ह्यातील प्रमुख पिके संत्री व कापूस ही नगदी पिके आहेत. खरीप हंगामात मुख्यतः तांदूळ, ज्वारी, भूईमुग, कापूस, मूग, तूर, सोयाबीन ,तर रब्बी हंगामात ज्वारी व ऊस, डाळी, ही पिके घेतली जातात. महाराष्ट्रात गव्हाच्या क्षेत्रात […]

नांदेड जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

ज्वारी व कापूस ही जिल्ह्यातील प्रमुख पिके असून काही भागात केळीचे पीकदेखील घेतले जाते. प्रामुख्याने किनवट तालुक्यातील जंगलांत बांबूची वने आहेत. नांदेड येथे कापूस संशोधन केंद्र आहे. जिल्ह्यात काळी कसदार मृदा मोठ्या प्रमाणात आढळते. या […]

ठाणे जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

ठाणे जिल्ह्यात डोंगराळ प्रदेश, खाड्यांचा प्रदेश व वाढते नागरीकरण यांमुळे शेतजमिनीचे (कृषी क्षेत्राचे) प्रमाण कमी आहे. भात हे येथील प्रमुख पीक आहे. एकूण लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी ५०% हून अधिक क्षेत्र भाताच्या लागवडीखाली आहे. पालघर, भिवंडी, […]

कोल्हापूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

कोल्हापूर जिल्ह्यात पाण्याचा मुबलक पुरवठा असल्यामुळे १२ महिने विविध पिके घेतली जातात. सहकारी साखर कारखान्यांमुळे ऊस हे येथील महत्त्वाचे पीक आहे. पश्चिमेकडील भागात मुख्यत: भात पिकतो. खरीप पिकांमध्ये मुख्यत: भाताव्यतिरिक्त ऊस, भुईमूग, सोयाबीन व ज्वारी, […]

1 2 3 4 5