बुलढाणा जिल्ह्याचा इतिहास

अजिंठ्याच्या डोंगररांगांमध्ये वसलेले हे शहर प्राचीन काळात ‘भिल्लठाणा’ म्हणून ओळखले जाई. भिल्लठाणा म्हणजे भिल्लाचे निवासस्थान वा मुक्कामाचे स्थान होय. काळाच्या ओघात या भिल्लठाणाचा अपभ्रंश होत-होत ‘बुलढाणा’ हे नाव रूढ झाले असे म्हटले जाते.बुलढाणा जिल्ह्याचा परिसर सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा एक भाग होता. त्यानंतर सातवाहनांचा, यादवांचा व बहामनींचा अंमल या प्रदेशावर होता असा उल्लेख इतिहासात आढळतो. बुलढाणा हा पूर्वीच्या बेरार प्रांतातील अकोल्यातून वेगळा केलेला जिल्हा आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*