ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलिया पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील एक खंड-देश आहे. याच्या भूभागात ऑस्ट्रेलिया खंड, तास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो.

साधारणपणे तीस ते पन्नास हजार वर्षे ऑस्ट्रेलियातील आदिवासी एकाच पद्धतीची जीवनपद्धतीने जगत होते. अठराव्या शतकात युरोपिय लोकांना या खंडाचा शोध लागला. आधी डच, फ्रेंच व मग ब्रिटिश येथे आले. त्या आधीच चीनी लोकांना ऑस्ट्रेलिया खंड ज्ञात होता. आलेल्या युरोपीयनांनी येथिल आदिवासींना हुसकावून लावले व आपल्या वसाहती वसवल्या. ज्यांनी विरोध केला त्यांच्या कत्तली करण्यात आल्या. पहिली वसाहत आताच्या सिडनी जवळ वसवण्यात आली. त्यानुसार सिडनी हे ऑस्ट्रेलियाचे आद्य शहर म्हणून ओळखले जाते.

युरोपातील पुराण कथांमधून ऑस्ट्रालिस या खंडाचा (काल्पनिक) उल्लेख आढळतो. मॅथ्यु फ्लिंडर्स या दर्यावर्दी खलाशाने ऑस्ट्रेलिया खंडाला प्रदक्षिणा पुर्ण केली त्यावेळी त्याला वाटले की ऑस्ट्रालिस सापडले. म्हणून त्याने नकाशावर ऑस्ट्रेलिया अशी नोंद केली. व या खंडाला ऑस्ट्रेलिया हे नाव मिळाले.

ऑस्ट्रेलियाच्या उत्तरेला हिंदी महासागर आणि इंडोनेशिया, पूर्व तिमोर व पापुआ न्यू गिनी हे देशच ईशान्येला पॅसिफिक महासागर आणि सोलोमन द्वीपे, व्हानुआटु व न्यू कॅलिडोनिया हे देश/प्रदेश तर आग्नेयेला न्यूझीलँड हा देश आहे. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेला दक्षिणी महासागर आहे.

दुसर्‍या जागतिक महायुद्धा नंतर येथे मुख्यतः इटली व ग्रीस येथून लोक देशांतरीत झाले. त्या नंतर पुर्व युरोपातील अनेक देशां मधून येथे राहण्यासाठी लोक आले. इ.स. १९७३ साली ऑस्ट्रेलिया हा फक्त गोर्‍या लोकांसाठी राखीव ठेवण्याचा कायदा (व्हाईट ऑस्ट्रेलिया पॉलिसी) रद्द करावा लागला. (इंग्रजी: White Australia Policy). व्हियेतनाम युद्धा नंतर व्हियेतनामी लोकांनीही मोठ्याप्रमाणात देशांतर केले. ऐशीच्या दशकात थायलंड, चीन व इंडोनेशिया‎ येथील लोकही आले.

ऑस्ट्रेलिया येथील शिक्षण पद्धती दोन विभागात विकसित आहे – तंत्र शिक्षण (इंग्रजी: Technical And Further Education TAFE ) व पदवी शिक्षण तसेच पदव्युत्तर शिक्षण उपलब्ध आहे. शिक्षण निर्यात हा येथील सरकार एक प्रमुख व्यवसाय मानते. विविध विद्यापीठे यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. मुख्यत: व्हियेतनाम , मलेशिया , इंडोनेशिया व चीन या देशातून येथे शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. भारतातून येणारे विद्यार्थी साधारण पणे ९% (संदर्भ?) आहेत असे मानले जाते. जास्तीत जास्त परदेशी विद्यार्थी मिळावेत यासाठी सर्व विद्यापीठांनी मिळून आय.डी.पी. एज्युकेशन (इंग्रजी: IDP Education) ही संस्था स्थापन केली आहे.

राजधानी : कॅनबेरा
सर्वात मोठे शहर : सिडनी
इतर प्रमुख भाषा : इंग्लिश
स्वातंत्र्य दिवस : १ जानेवारी १९०१
राष्ट्रीय चलन : ऑस्ट्रेलियन डॉलर


Australia is a country and continent surrounded by the Indian and Pacific oceans. Its major cities – Sydney, Brisbane, Melbourne, Perth, Adelaide – are coastal. Its capital, Canberra, is inland. The country is known for its Sydney Opera House, the Great Barrier Reef, a vast interior desert wilderness called the Outback, and unique animal species like kangaroos and duck-billed platypuses.

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*