अफगाणिस्तान

अफगाणिस्तान हा आशियाच्या साधारणतः मध्यभागी असलेला एक भूपरिवेष्टित देश आहे. भौगोलिक वर्गीकरणात याला काही वेळा मध्य आशियात, काही वेळा दक्षिण आशियात, तर काही वेळा मध्य पूर्वेत गणले जाते; कारण बहुतेक सर्व शेजारी देशांशी याचे धार्मिक, वांशिक, भाषिक व भौगोलिक संबंध जोडले गेले आहेत. महाभारतामधील कौरवांचा मामा व गांधारीचा बंधू शकुनी मूळ ह्याच देशातला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा सरनौबत नेताजी पालकर याला औरंगजेबाने जबरदस्तीने मुसलमान करून अफगाणिस्तानातच ठेवले होते. एकेकाळी आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिशय संप्पन्न व प्रगत होता. पण आज हा देश दुर्दैवाने जागतिक दहशतवादाचे प्रमुख केंद्र बनला आहे. अफगाणिस्तानमधील सोव्हियेत युद्धानंतर अनेक वर्षे चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये अफगाणिस्तानचे अतोनात नुकसान झाले. १९९६ ते २००१ दरम्यान अफगाणिस्तानवर तालिबान ह्या अतिरेकी गटाची सत्ता होती. २००१ सालच्या नाटोच्या आक्रमणादरम्यान तालिबानचा पाडाव झाला व हमीद करझाई राष्ट्राध्यक्षपदावर आला. सध्या येथे अध्यक्षीय प्रजासत्ताक आहे.

अफगाणिस्तानची लोकसंख्या २९ दशलक्ष असून, क्षेत्रफळ ६४७,५०० वर्ग किलोमीटर एवढे आहे. आकाराच्या दृष्टीने या देशाचा क्रमांक ४१ वा असून, लोकसंख्येच्या दृष्टीने या देशाचा क्रमांक ४२ वा आहे. काबुल ही अफगाणिस्तानाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

अफगाणिस्तानच्या दक्षिण आणि पूर्व भागात पाकिस्तान व पश्चिमेला इराण हा देश आहे; तसेच उत्तरेला तुर्कमेनिस्तान, उझबेगिस्तान व ताजिकिस्तान हे देश आहेत.

राजधानी काबूल अफगाणिस्तानचे सगळ्यात मोठे शहर आहे. येथे दहा लाखांपेक्षा अधिक लोक राहतात. याशिवाय कंदहार, हेरात, मझार ए शरीफ, जलालाबाद, गझनी व कुंडुझ ही इतर मोठी शहरे आहेत.

राजधानी व सर्वात मोठे शहर : काबुल
अधिकृत भाषा : दारी, पश्तू
स्वातंत्र्य दिवस : ऑगस्ट १९, इ.स. १९१९

देश : अफगाणिस्तान
राजधानी : काबूल
चलन : अफगाण अफगाणी


Country : Afghanistan
Capital city : Kabul
Currency : Afghan afghani
Calling code : 93
Country Domain : .af

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*