यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास

यवतमाळ ह्या शहराचे नाव आधी ‘यवत’ अथवा ‘यवते’ असावे असे मानले जाते. या यवत किंवा यवतेचा माळ (टेकडीवरील सपाटीचा प्रदेश) किंवा ‘यवते’ चा महाल (परगणा किंवा विभाग) अशा शब्द रचनेतून ‘यवतमाळ’ हे नाव पडले असावे. अकबराच्या दरबारातील अबूल फजल याने लिहिलेल्या ‘ऐन-ई-अकबरी’ मध्ये यवतचा ‘योत-लोहार’ असा उल्लेख आढळतो. लोहार हे यवतमाळच्या पश्चिमेस पाच कि.मी. अंतरावर असलेले खेडेगाव असून ‘योत’ हा यवताचा उर्दू अपभ्रंश असावा. गोंड, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव या घराण्यांच्या सत्ता विविध कालखंडांत यवतमाळवर होत्या. ब्रिटिश काळात वर्‍हाड प्रांतात १८६४ साली या जिल्ह्याची स्थापना झाली. त्या वेळी हा जिल्हा ‘वणी’ किंवा ‘ऊन’ या नावाने ओळखला जात असे. १९०५ मध्ये या जिल्ह्याचे यवतमाळ असे नामांतर झाले. १९५६ पर्यंत हा जिल्हा मध्यप्रदेश राज्यात होता. १९५६ च्या राज्य पुनर्रचनेत हा जिल्हा मुंबई राज्यात, तर दिनांक १ मे, १९६० पासून महाराष्ट्र राज्यात समाविष्ट झाला.

1 Comment on यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास

Leave a Reply

Your email address will not be published.


*