बुलढाणा जिल्ह्यातील लोकजीवन

बुलढाणा जिल्ह्यातील डोंगराळ भागात महादेव काळी, भिल्ल, पारधी, कोरकू  व निहाल यांसारख्या जमातीचे लोक राहतात. कोरकू व निहाल या जमातींची वस्ती ‘जळगाव-(जामोद)’ या तालुक्यात जास्त आहे. मेहकर व चिखली तालुक्यांत ‘बंजारा’ या भटक्या विमुक्त जमातीच्या लोकांची संख्या ही अधिक आहे.
शैक्षणिकदृष्ट्या बुलढाणा जिल्हा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत येतो. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात एकूण १६ महाविद्यालये आहेत. चिखली व शेगाव ही प्रमुख शैक्षणिक केंद्रे आहेत. बुलढाणा येथील क्षयरोग निवारण केंद्र व खामगाव येथे कुष्ठरोग निवारण केंद्र या दोन प्रमुख संस्था जिल्ह्यात कार्यरत आहेत.

1 Comment on बुलढाणा जिल्ह्यातील लोकजीवन

  1. कोरकू आदिवासी कोणत्या ग्रामात राहते ते माहीती होईल का

Leave a Reply

Your email address will not be published.


*