बीड जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

जिल्ह्यात केवळ बीडमधे औद्योगिक वसाहत आहे. १९७० साली परळी येथे औष्णिक विद्युत केंद्र उभारण्यात आले. १९९५ मध्ये वृक्षारोपणासाठी महाराष्ट्र शासनाच्या वनश्री पुरस्काराने या केंद्रास गौरविण्यात आले.
जिल्ह्यात एकूण सात सहकारी साखरकारखाने आहेत:
१. अंबेजोगाई तालुक्यातील आंबासाखर येथील अंबेजोगाई सहकारी साखर कारखाना
२. गेवराई तालुक्यातील शिवाजीनगर येथील जय भवानी सहकारी साखर कारखाना
३. माजलगांव तालुक्यातील तेलगांव येथील माजलगांव सहकारी साखर कारखाना
४. परळी वैजनाथ तालुक्यातील परळी वैजनाथ येथील वैजनाथ सहकारी साखर कारखाना
५. बीड तालुक्यातील सोनाजीनगर येथील गजानन सहकारी साखर कारखाना
६. आष्टी तालुक्यातील कडा येथील कडा सहकारी साखर कारखाना
७. केज तालुक्यातील उमरी येथील पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखाना.
परळी येथे विजेचे दिवे व विजेच्या इतर साहित्याच्या निर्मितीचा कारखाना आहे. त्याचबरोबर तेल गिरणी व कापूस कारखाना देखील आहे. बीड व वडवणीमध्ये हातमाग आहे. तेलगिरण्या परळीसोबतच बीड व अंबेईजोगाई तालुक्यां मध्ये आहेत. मराठवाडा विकास महामंडळातर्फे बीड येथे चर्मोद्योग प्रकल्प राबविण्यात येत असून,येथे बनवले जाणारे छागल नावाचे चामड्याचे बुधले प्रसिद्ध आहेत. पाटोदा तालुक्यातील अमळनेर हे गाव तांबे-पितळ्याच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात बांधकामाचा दगड मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने संबंधित उद्योग व व्यवसाय उपलब्ध आहेत.

Einordnung in die https://www.best-ghostwriter.com/essay-schreiben/ musikgeschichteseit der zweiten hälfte des 19

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*