नागपूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

या जिल्ह्यातील प्रमुख पिके संत्री व कापूस ही नगदी पिके आहेत. खरीप हंगामात मुख्यतः तांदूळ, ज्वारी, भूईमुग, कापूस, मूग, तूर, सोयाबीन ,तर रब्बी हंगामात ज्वारी व ऊस, डाळी, ही पिके घेतली जातात. महाराष्ट्रात गव्हाच्या क्षेत्रात नागपूर जिल्हा पहिल्या ५ जिल्ह्यांमधे आहे. महाराष्ट्रात तेलबियांच्या उत्पादनात नागपूरचा दुसरा क्रमांक लागतो. नागपूरची संत्री जगभरात प्रसिध्द आहेत. कमी पाऊस, कोरडे हवामान, पाण्याचा निचरा होणारी जमीन या वैशिष्टयांमुळे नागपूरमध्ये संत्र्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. जिल्ह्यात सर्वत्र संत्र्यांच्या बागा आढळतात. येथे टिश्यू कल्चर, कापणीनंतरचे तंत्रज्ञान अशी केंद्रे उभारलेली आहेत. नागपूरला संत्र्यांचे शहर किंवा नारिंगी शहर (ऑरेंज सिटी) असेही म्हटले जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*