जालना जिल्ह्यातील पर्यटनस्थळे:

राजूर येथील श्री गणेश मंदिर – अनेक श्रध्दास्थाने असणार्‍या मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातील राजूरचा गणपती हेही असंख्य भक्तांचे श्रध्दास्थान आहे. जालना जिल्हयातील राजूर हे गणपतीचे पूर्ण पीठ मानले जाते. महाराष्ट्रात मोरगांव, चिंचवड व राजूर ही श्रीगणेशाची तीन पूर्ण पिठे तर पद्मालय हे अर्ध पीठ मानले जाते. अशा प्रकारची नोंद गणेशपुराणात आढळते. राजूर या गावाची नोंद स्थान पोथीतही आहे. स्थानपोथीतील वर्णनाप्रमाणे राजौरी (सध्याचे राजूर) या गावाच्या पश्चिमेतील एका देवळात चक्रधर स्वामी थांबत असत.
अंबड येथील मत्स्योदारी देवी – जिल्ह्यातील प्राचीन मंदिर म्हणून मानले जाणारे श्री मत्स्योदरी देवीचे मंदिर जालना शहरापासून २१ कि.मी. अंतरावर असलेल्या अंबड येथे आहे. हे मंदिर ज्या टेकडीवर आहे त्याचा आकार माशासारखा असल्यामुळे ह्या देवीला मत्स्योदरी असे म्हटले जाते.
जांबुवंताचे मंदिर – रामायण काळातील जांबुवंताचे अतिशय दुर्मीळ (बहुधा भारतातील एकमेव) मंदिर अंबड तालुक्यातील जांबुवंतगड येथे आहे.
याचबरोबर या जिल्ह्यात जळीचा देव(जयदेववाडी), हेलंस गाव (मंठा तालुका), आंतरराष्ट्रीय उपग्रह अनुश्रवण केंद्र (इंदेवाडी), आनंदस्वामींचा मठ, मोती तलाव, मोती बाग ही ठिकाणेही पर्यटनासाठी प्रसिध्द आहेत.

1 Comment on जालना जिल्ह्यातील पर्यटनस्थळे:

Leave a Reply

Your email address will not be published.


*