सोलापूर – दक्षिणेतील प्रवेशव्दार

सोलापूर हे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र आहे. हे दक्षिणेतील प्रवेशद्वार आहे.

कुर्डुवाडी व होटगी ही जंक्शन्स जिल्ह्यात आहेत. मुंबई-चेन्नई, सोलापूर-विजापूर व मिरज-लातूर हे तीन लोहमार्ग या जिल्ह्यातून गेले आहेत.

कन्याकुमारी, चेन्नई, मुंबई आगरा, दिल्ली, हरिद्वार, भुवनेश्वर, बंगलोर, हैदराबाद अशी अनेक शहरे रेल्वेद्वारे सोलापूरला जोडली गेली आहेत.

सोलापुरातून पुणे – हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ९, सोलापूर-विजापूर-मंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. १३, सोलापूर-औरंगाबाद-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ व रत्नागिरी-नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्र. २०४ जातो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*