सिंधुदूर्ग जिल्ह्यातील शेती

सिंधुदुर्ग हा कृषिप्रधान जिल्हा असून येथील भात हे प्रमुख पीक आहे. सावंतवाडी, कुडाळ, मालवण व कणकवली ह्या तालुक्यांत भाताचे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते. तसेच नाचणी,वरई, कुळीथ ही सुद्धा जिल्ह्यातील प्रमुख पिके आहेत.जमिनीस व हवामानास अनुकूल अशी फळ पिकेही या जिल्हयात घेतली जातात. नारळ,रातांबे,फणस, सुपारी, आंबा व काजू ही तेथील प्रमुख फळपिके असून,देवगडचा हापूस आंबा जगप्रसिध्द आहे.ह्या आंब्याची मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात केला जातो. जिल्ह्यात सिंचन व्यवस्था असलेले एकूण क्षेत्र केवळ २३.४८% इतके आहे. ३३,९१० हेक्टर क्षेत्र सिंचित आहे. कोकण कृषीविद्यापिठाअंतर्गत वेंगूर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात आंबा-काजू व ‘सिंधू’ ही आंब्याची प्रसिद्ध संकरीत जात तयार केली आहे. यावर संशोधन केले जाते. देवगड व मालवण तालुक्यात मत्स्यव्यवसायाचे शिक्षण देणार्‍या शाळा कार्यरत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*