सिंधुदूर्ग जिल्ह्याची भौगोलिक माहिती

सिंधुदूर्ग महाराष्ट्र राज्यातील सागरतटीय जिल्हा आहे, व याचे प्रशासकीय केन्द्र सिंधुदुर्ग नगरी, ओरस येथे आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक किल्ले (३७), जलदुर्ग, गिरिदुर्ग व भुईकोट किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पश्चिमेला१२१ कि. मी.चा समुद्र किनारा लाभला असून पूर्व सीमा सह्याद्रीच्या मुख्य रांगांनी सिमीत आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग डोंगराळ व उंचसखल आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळता हा जिल्हा आकारमानाचा विचार करता राज्यातील सर्वांत लहान जिल्हा आहे. राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे १.७०%(३८६४३ हेक्टर) क्षेत्र ह्या जिल्ह्याच्या वाट्यास आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेला रत्नागिरी; पुर्वेला कोल्हापूर; दक्षिणेला गोवा व कर्नाटकातील काही जिल्हे,अशी जिल्ह्यांची रचना आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे असा प्रवास केल्यास, विजयदुर्ग खाडी, देवगड खाडी,कर्लीची खाडी – अशा खाड्या निर्माण झालेल्या दिसून येतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*