वाशिम जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

वाशिम जिल्ह्याचा बराचसा भाग हा डोंगराळ व पठारी असून वनच्छादीत आहे. नद्या व विहिंरीद्वारे केल्या जाणार्‍या जलसिंचनाचे प्रमाण जिल्ह्यात अधिक आहे. जिल्ह्यातील निव्वळ लागवडीखालील क्षेत्र ४,०१,००० हेक्टर्स इतके आहे. यापैकी जिरायत क्षेत्र २,८४,००० इतके आहे, तर बागायती क्षेत्र १,१७,००० इतके आहे. . कापूस हे जिल्ह्यातील प्रमुख नगदी पीक असून ज्वारीची लागवडही मोठया प्रमाणावर केली जाते. संत्री, ऊस व विड्याच्या पानांचे पिक जिल्ह्यात घेतले जाते. खरीप हंगामात कापूस, ज्वारी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तांदूळ ही पिके घेतली जातात, तर रब्बी हंगामात गहू, हरभरा, जवस, करडई ही पिके घेतली जातात. जिल्ह्यात वाशिम तालुक्यातच कापसाची लागवड मोठया प्रमाणावर आहे. जिल्ह्यातील वाशिम, रिसोड आणि कारंजा येथे संत्र्याच्या बागा आहेत. तसेच रिसोड, वाशिम व मानोरा ह्या तालुक्यांत गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतात. मंगळूरपीर तालुक्यात हरभरा मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. उसाच्या लागवडीचे क्षेत्रही या जिल्ह्यात वाढते आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*