वर्धा जिल्ह्यातील नामवंत व्यक्तीमत्वे

आचार्य विनोबा भावे – आचार्य विनोबा भावे यांचे याच जिल्ह्यातील गोपुरी येथे अनेक वर्ष वास्तव्य होते. त्यांच्या कार्यामुळे वर्धा जिल्हा सतत प्रकाशात राहिला.

जमनालाल बजाज – महात्मा गांधीजींचे शिष्य प्रसिद्ध उद्योजक जमनालाल बजाज यांचेही वास्तव्य बराच काळ वर्धा जिल्ह्यात होते.

प्रा. श्याम मानव – अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रवर्तक प्रा. श्याम मानव यांच्या कार्याला वर्धा जिल्ह्याचीच पार्श्र्वभूमी लाभली.

प्रा. देवीदास सोटे – वर्‍हाडी कोशकार प्रा. देवीदास सोटे यांच्या कार्याला वर्धा जिल्ह्याचा सिंहाचा वाटा लाभला.

याचबरोबर ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजदत्त, संजय सूरकर (दिग्दर्शक), बी. विठ्ठल (चित्रकार व शिल्पकार); वामनराव चोरघडे (साहित्यिक) या सुप्रिसिद्ध कलाकारांनी आपल्या कलाजीवनाची सुरुवात वर्धा जिल्ह्यातून केली. पुरूषोत्तम दारव्हेकर (नाट्यदिग्दर्शक), डॉ. प्रकाश संगीत (संगीतकार); स्व. एम. डी. देशमुख (नाट्य कलावंत) हे कलाकार देखील वर्धा जिल्ह्यातलेच.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*