रायगड जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

भात’ हे रायगड जिल्ह्याचे मुख्य पीक असून लागवडीखाली असलेल्या क्षेत्रापैकी जवळजवळ ७०% क्षेत्रात हे पीक घेतले जाते. भात उत्पादनात संपूर्ण महाराष्ट्रात रायगड जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. माणगाव, अलिबाग, पेण, पनवेल या तालुक्यात भाताचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. पोलादपूर, महाड, रोहे या तालुक्यांत नाचणी व वरई हीदेखील पिके बर्‍याच प्रमाणात पिकवली जातात. याचबरोबर अलिबाग, श्रीवर्धन, मुरूड येथे माडाच्या मोठ्या बागा असून नारळ हे मुख्य फळ घेतले जाते. पोफळी व सुपारींची आगरेही श्रीवर्धन, अलिबाग, मुरूड येथे अधिक प्रमाणत आढळतात. श्रीवर्धन येथील रोठा जातीची सुपारी प्रसिद्ध आहे. येथील डोंगरउतारावरील तांबड्या मातीत आंब्याची लागवड केली जाते. कमी-अधिक प्रमाणात रातांबा म्हणजेच कोकमाची झाडेही पाहायला मिळतात. वाल, तूर, काजू, कलिंगड यांचेही उत्पादन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. समृद्ध अशा सागरकिनार्‍यांमुळे या जिल्ह्यात मत्स्यशेतीही केली जाते. प्रामुख्याने यात कोळंबीची शेती केली जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*