बोकजन

आसाममधील कार्बी अँनलाँग जिल्ह्यातील एक शहर बोकजन. आसाम आणि नागालँडच्या सीमेवर असलेले हे शहर दिमापूरपासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. समुद्रसपाटीपासून १३८ मीटर उंचीवर वसलेले हे शहर अॅटोनोमस जिल्हा लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहे. १९९३६ इतकी या शहराची लोकसंख्या आहे.

बोकजन शहरात सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) या कंपनीची सर्वाधीक तीन युनिट आहेत. भारत सरकारचा अंगीकृत उपक्रम असलेल्या या कंपनीची देशभरात एकूण १० युनिट कार्यरत आहेत. आसामी ही जरी येथील मुख्य भाषा असली हिंदी व काही प्रमाणात इंग्रजी भाषा येथे बोलली जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*