धुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

लळिंग किल्ला – धुळे जिल्ह्यातील हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला आहे. लळिंग किल्ला हा धुळे – मालेगाव रस्त्यावर धुळ्यापासून ८ किमी अंतरावर आहे. मुंबई – आग्रा महामार्ग किल्ल्याला लागुनच पुढे जातो.
साक्री – धुळे जिल्यात साक्री येथे जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प अस्तित्वात येत असून धुळे जिल्ह्याचे नाव जागतिक नकाशावर उमटण्यास मदत होईल. तसेच अनेक उद्योग धंदे धुळे जिल्ह्याकडे आकर्षित होण्याची शक्यता त्यामुळे वाढण्यास मदत होईल. काही प्रमाणात का होईना महाराष्ट्र राज्याचे वीज संकट कमी होण्यास मदत होईल. सदर प्रकल्प हा अपारंपरिक उर्जेचा असल्याने कुठल्याही प्रकारची नैसर्गिक हानी होत नसून, उर्जेचा जास्तीत वापर होईल व पर्यावरण संवर्धनास मोठी मदत होईल.
याचबरोबर धुळे जिल्ह्यात लळिंग कुरण, शिरपूरचे बालाजी मंदिर, धरणे, बिजासन देवी मंदिर, नकाणे तलाव, एकवीरा देवी मंदिर, राजवाडे संशोधन मंडळ,तसेच पेढकाई देवी हे प्रसिद्ध देवस्थान आणि क्रांतीस्मारक हे धुळे जिल्यातील साळवे ह्या गावी वसलेलं ऐतिहासिक ठिकाण ही पर्यटनस्थळे आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*