धुळे जिल्ह्याचा इतिहास

भगवान श्रीकृष्णाच्या पदस्पर्शाने पावन झालेला धुळे जिल्हा आकाराने लहान असला तरी अनेक वैशिष्ट्यांनी समृध्द आहे. प्राचीन काळी हा प्रदेश कृषिक म्हणून ओळखला जाई रामायण-महाभारतामध्ये तसे उल्लेख आढळतात. त्यानंर यादव काळात राजा सेऊणचंद्राच्या नंतर सेऊण देश या नावानेही प्रचलीत होता. महाभारताच्या भिष्म पर्वात विविध प्रदेशांचा गोमता, मंदका, खंडा, विदर्भा व रुपवाहिका असा उल्लेख आढळतो. त्यातील खंडा म्हणजेच खानदेश असा अर्थ पाश्चात्य इतिहासकारांनी लावलेला आहे, तर काही अभ्यासकांच्या मते खानदेशचे पुर्वीचे नाव कन्हदेश म्हणजेच कृष्णाचा देश असे होते. गुजरातचा सुलतान पहिला अहमद याने या प्रदेशात थाळनेरचा दुसरा फारुकी राजा मलिक याला खान ही पदवी बहाल केली होती व त्यावरुन खानदेश असे नाव पडले.
ब्रिटीश काळात धुळे व जळगाव हे सध्याचे जिल्हे मिळून खानदेश हा एकच जिल्हा होता. नंतरच्या काळात खानदेशाचे पूर्व खानदेश व पश्र्चिम खानदेश असे दोन भाग करण्यात आले. १९६१ मध्ये पश्चिम खानदेशचे ‘धुळे जिल्हा’ असे नामकरण करण्यात आले. जिल्ह्याला पूर्वी धूलिया म्हणून ओळखले जाई. या क्षेत्राला रसिका पण म्हटले जाई. १९६० रोजी धुळे हे मुंबई राज्यातून महाराष्ट्रात आले. प्राचीन काळात अभीर किंवा अहीर राजे खानदेशात राज्य करत होते.

1 Comment on धुळे जिल्ह्याचा इतिहास

Leave a Reply

Your email address will not be published.


*