जालना जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

जिल्ह्यात जालना, परतूर,अंबड, भोकरदन, जाफराबाद व जालना येथे औद्योगिक वसाहती असून,जालना शहर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र आहे. जालना जिल्ह्यात ४ साखर कारखाने आहेत.जालना व आष्टी येथे हातमाग व यंत्रमाग उद्योग चालतो. जालना येथे धातू उद्योगासह अनेक तेल गिरण्या असून विडी व्यवसायही मोठ्या प्रमाणावर चालतो. जालना व परतूर ही शहरे जिनिंग व प्रेसिंग उद्योगासाठी प्रसिद्ध आहेत. जिल्ह्यातील मंठा येथील गुरांचा बाजार आजूबाजूच्या जिल्ह्यांत प्रसिद्ध आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*