चंद्रपूर जिल्ह्यात ५६ टक्के जंगल

चंद्रपूर जिल्ह्यातील ४ भाग

चंद्रपूर जिल्ह्यात भौगोलिदृष्ट्या ४ भाग पडतात. त्यामध्ये काळ्या जमिनीचा मैदानी प्रदेश, उंचसखल प्रदेश आणि पूर्वेचा डोंगराळ प्रदेश, या भागांचा समावेश आहे. नदी खोर्‍यांची सुपीक जमीन आहे.

महाराष्ट्रातील जंगलापैकी २० टक्के जंगल चंद्रपूर जिल्ह्यात आहे. जिल्ह्याचा ५६ टक्के भाग जंगलयुक्त असून, त्यापैकी ३१ टक्के जंगलाचा भाग राखीव आणि ५९ टक्के जंगलाचा भाग संरक्षित आहे. साग, बिजा, ऐन, धावडा, हळद, कळंब, शिसवे, अंजन, सेमल, मोवई, सेलई, इत्यादी महत्त्वाची झाडे या जंगलात आढळतात. मोहाची फळे व फुले, तेंदूची पाने अशी महत्त्वाची जंगल उत्पन्नेही होतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*