औरंगाबाद जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

कापूस लोकर आणि वनस्पतीजन्य तेलांचा व्यवसाय या जिल्ह्यात ऐतिहासिक काळापासून चालतो आहे. कापूस आणि रेशीम यांच्या एकत्रीकरणातून तयार झालेल्या हिमरू नावाच्या वस्त्रप्रकारासाठी औरंगाबाद ओळखले जाते. पैठणी या नावाने आजही लोकप्रिय असलेल्या रेशमी साड्यांचे उत्पादनही औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात होई. पैठण या औरंगाबादच्या जवळच्या गावाच्या नावावरूनच या प्रकाराचे नाव पडले. हिमरू शाली आणि पैठण्यांच्या व्यवसायाची कालौघात बरीच पडझड झाली असली तर औरंगाबाद सिल्क मिल्स आणि स्टॅन्डर्ड सिल्कमिल्स सारख्या उद्योगांमध्ये आजही रेशमी आणि हिमरू वस्त्रांचे उत्पादन चालते. औरंगाबादेमध्ये औद्यौगिक वसाहती १९७० च्या दशकात सुरू झाल्या.
स्वयंचलित वाहने आणि वाहनांचे सुटे भाग, बिअर आणि व्हिस्की तसेच शीतपेयांची निर्मिती हा औरंगाबादमध्ये भरभराटीला आलेला उद्योग आहे. या दोन्ही क्षेत्रातील उद्योगधंदे औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याशिवाय चामडे, औषधनिर्मिती, रबर, बी-बियाणे आणि कीटकनाशके ही औरंगाबादेतील प्रमुख उत्पादने होत. औरंगाबादमध्ये निर्लेप, लुपिन लॅबोरेटरी, ग्रीव्ह्ज कॉटन लिमिटेड, गरवारे पॉलिएस्टर्स ,औरंगाबाद सिल्क मिल्स, केविल सोल्यूशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे प्रकल्प आहेत. शिवाय अनेक भारतीय आणि परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्या आणि उद्योगसमूहांचे कारखाने औरंगाबादेत आहेत.

It’s rung down the curtain write my essay for free using https://essay4today.com/ and joined the choir invisible

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*