लेखक : विनायक नारायण आनिखिंडी
किंमत : २००/-
पाने : १२०
प्रकाशक : शब्दजा प्रकाशन
ISBN : 978-93-88939-09-06
पुस्तकाचे स्वरूप/प्रकार : छापील पुस्तक
वर्गवारी : चरित्र
बाईंडिंगचा प्रकार : पेपरबॅक
प्रकाशकाचे नाव आणि संपर्क, : राजेश बहाळे, शब्दजा प्रकाशन, फ्लॅट न. 101/103,
दुर्गा रेसिडेन्सी धनश्री कॉलनी, मालू-ले-आऊट,
कलोतींनगरच्या पाठीमागे
अमरावती – ४४४६०६
मो. ९२२६२२३३८००
लेखकाचा संपर्क : विनायक नारायण आनिखिंडी
D-३०१ साई लॉरेल पार्क, कृष्णा चौका जवळ,
पिंपळे गुरव पुणे ४११०६१
मो.. ९९२२९७०३१७
परिचय :
– “मनाच्या नजरेतून” हा कविता संग्रह २०१६ रोजी प्रकाशित
– वेगवेगळ्या दिवाळी आंकत मासिकात कविता, लेख प्रकाशित
– अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना सहित अनेक कविसंमेलानात कवितांचे सादरीकरण
– ‘शून्य’ नावाची कविता सकाळ वर्तमान पत्रात प्रकाशित आणि महाराष्ट्रभरातून उत्तम प्रतिसाद
– “विजक्का” स्त्री चरित्रावरील पुस्तक प्रकाशित २०१९
पुस्तकाचा परिचय:
“विजक्का” हे पुस्तक लेखक विनायक आनिखिंडी यांच्या epilepsy किंवा फिट येणे या आजाराने ग्रस्त आणि वयानुसार बुद्धीची वाढ न झालेल्या सख्या बहिणी च्या जीवनाची आणि त्याच्या सामाजीक, कुटुंबिक पैलू असलेली अतिशय हृदयस्पर्शी कहाणी आहे.
पुस्तकाची प्रस्तावना
वयानुसार बुद्धीची वाढ न झालेली आणि epilepsy किंवा फिट येणे या आजाराने ग्रस्त असलेली आणि माझी मोठी बहीण विजयलक्ष्मी ही तिच्या वयाची ४४ वर्ष लहान मुलासारखी जागली. तीच माझ्यावरील प्रेम आणि आमच्या भावा बहिणीतील नात्याने तिच्या बरोबर होणार्या संभाषणाने मला देखील ३४ वर्ष बालपण जगल्याचा अनुभव आला. ती गेल्या पासून जवळ जवळ १५ वर्ष मनातील होणारा भावनेचा उद्रेक लेखनाच्या रूपाने अभिव्यक्त झाला. हे पुस्तक म्हणजे विजक्का च्या स्वभाव वैशिष्ठ्या बरोबरच अश्या व्यक्तींना सांभाळताना कुटुंबाला सामोरे जाव्या लागणार्या कौटुंबिक, सामजीक इतर प्रसंगांचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे. अतिशय ह्रदयस्पर्शी अस हे पुस्तक आहे.
Leave a Reply