वैज्ञानिकाचा सत्याचा शोध

Vaidnyanikacha Satyacha Shodh

पुस्तकाचे नाव : वैज्ञानिकाचा सत्याचा शोध
लेखक : स्वामी विराजेश्वर
किंमत : रु. २५०
पाने : २९०
प्रकाशक : संतोष विलास मोहिले
ISBN :
बाइंडिंगचा प्रकार :
वर्गवारी : अध्यात्मिक

 

 


पुस्तकाचा संक्षिप्त परिचय

`वैज्ञानिकाचा सत्याचा शोध’ हे एक मनाला भुरळ घालणारे आत्मकथन आहे. जे अगदी कोणाचेही असू शकते, अगदी तुमचे सुद्धा! आत्मदर्शनाच्या दुर्गम वाटेवर वाटचाल करणार्‍या एका नवागत साधकाने मानवी गुणदोषांवर मात करत मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे केलेल्या प्रवासाची गाता पानापानागणीक आपल्या समोर सहज उलगडत जाते.

स्वामी विराजेश्वर, मुंबई विद्यापिठाचे तरुण पदवीधर, मनांत आशाआकांक्षांची स्वप्ने बाळगून अमेरिकेला जातात. योगा या विषयाचा त्यांना गंधही नसतो. अमेरिकेत ते योगा मार्गाकडे प्रवृत्त होऊन योगसाधना सुरु करतात. काही वर्णद्वेषी गोर्‍यांच्या छळवादालाही त्यांने सामोरे जावे लागते. स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यू जर्सी येथून PhD मिळाल्यावर ते IBM Research Lab मध्ये 4th Generation अतिवेगवान संगणक विकसित करण्याची जबाबदारी सांभाळतात.

विज्ञानाच्या अंतिम परिणामांच्या फोलपणाची जाणिव झाल्यावर, या तरुण वैज्ञानिकाने सर्व काही सोडून मानवी जीवनाचे सत्य जागण्यासाठी हिमालयाची वाट धरली आणि ध्यानसमाधीच्या खोलवर अंतरंगात उतरुन, `मी म्हणजे कोण? ईश्वर म्हणजे काय? माझ्या आस्तित्त्वाचे प्रयोजन काय?’ या मुलबूत प्रश्नांचा ध्यासपूर्वक पाठपुरावा केला.

त्या योगशोधांची परिणीती आत्मबोध व अखंड निरामय आत्मिक शांतीमध्ये झाली. त्यायोगे त्यांच्यातील वैज्ञानिक संतपदाला पोहोचला.

हे अतिशय प्रामाणिक कथन, अध्यात्ममार्गावरच्या साधकाला मनोरंजकतेने, कधी हलक्याफुलक्या विनोदी शैलीने अत्यांत मोलाचे मार्गदर्शन करेल. `वैज्ञानिकाचा सत्याचा शोध’ हे पुस्तक आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? हे प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कारी पुरुषाच्या सहज शब्दात विषद करते, आणि वाचकांना लेखकाबरोबर अकंड चिरंतन शांतीच्या मुक्कामापर्यंतची यात्रा घडवते.




पुस्तक येथेच ऑनलाईन खरेदी करा


vaidnyanikacha-satyacha-shodh-Front

vaidnyanikacha-satyacha-shodh-back

लेखकाचा संपर्क : 

स्वामी विराजेश्वर 
हंस आश्रम
अनुसोनी, केलामंगलम मार्गे,
जिल्हा – कृष्णगिरी,
तामिळनाडू ६३५११३

प्रकाशकाचा संपर्क : 

संतोष विलास मोहिले
रामनाथ निवास, दुसरा मजला
गोखले रोड (उत्तर), क्रॉस लेन नं १, रोड नं ८६
दादर, मुंबई ४००२२८

दूरध्वनी : ०२२ – २४२२५८२०

इ-मेल :  santoshmohile@hotmail.com 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*