तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता

तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता

पुस्तकाचे नाव : तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता
लेखक : यशवंत मनोहर
किंमत : २००/-
पाने : १२४
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह
ISBN : ९७८-९३-५०९१-१९८-३
बाइंडिंगचा प्रकार : परफेक्ट बायंडिंग

वर्गवारी : कविता

पुस्तकाचा संक्षिप्त परिचय :

'तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता' शोषणाची सर्व हिंस्र सत्ताकेंद्रे आणि त्यांची पायाभूत तत्त्वज्ञानेही उद्ध्वस्त करते. वर्चस्ववादी सत्ताकेंद्रांची चाकरी करणाऱ्या चैतन्यवादी भाषेचा तुरुंगही ही कविता तोडते आणि पूर्ण लौकिकतावादी सर्जक भाषेची निर्मिती करते, हा या कवितेचा मूल्यसंग्राम अनन्य असाच आहे.

धर्म, अर्थ आणि पुरुष या सर्व शोषणाच्याच अमानुष सत्ता आहेत हे भान प्रखर असल्यामुळे यशवंत मनोहर यांची ही कविता तुरुंग तोडणाऱ्या उठावांचे आवाज बुलंद करते. ही कविता भक्तिशरण, परिस्थितीशरण, निराशाशरण वा ताटस्थशरण होत नाही आणि शोषणरचनांना मजबूत करण्याचे कुकर्म करत नाही.

या कवितेत बुद्धी भावनामय होते आणि भावना बुद्धिमय होते हा वैश्विक Wisdom चाच वा प्रज्ञानाचाच सोहळा असतो. या कवितेतील प्रतिमा जीवनातील संघर्षांतून उगवतात. नवनव्या बंधांशी, संदर्भांशी आणि आव्हानांशी झटापट करत या कवितेची भाषा स्वत:तील अनंत सुप्त शक्ती प्रकट करते. ही भाषा जीवनाची परम घुसमटही मांडते आणि तिच्यावर मात करणारे वैश्विक मानवतेचे उत्कट आर्तही मांडते.

विविधतेच्या सौहार्दाची नक्षत्रे माथ्यात असलेली ही कविता कोणत्याही विषमतेची मात्र गय करत नाही, त्यामुळे ती अनन्य अशा दाहक सत्याचे आणि विधायक सौंदर्याचे परत उदाहरण झालेली आहे.

प्रकाशकाचा संपर्क : 

मौज प्रकाशन, मुंबई

१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट
म्युनिसिपल मार्केटच्या वर
विलेपार्ले (प), मुंबई

इ-मेल : moujdigital@gmail.com
दूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९