आव्हान भारताच्या बाह्य सुरक्षेचे

आव्हान भारताच्या बाह्य सुरक्षेचे

पुस्तकाचे नाव : आव्हान भारताच्या बाह्य सुरक्षेचे
लेखक :  ब्रिगेडिअर हेमंत महाजन
किंमत : रु.१००/-
पाने : १४४
प्रकाशक : मराठीसृष्टी
वर्गवारी : युद्धविषयक, आंतरराष्ट्रीय संबंध, राष्ट्रीय सुरक्षा

ई-पुस्तक 

“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चिंतेचा विषयही झाला आहे. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे. या पुस्तकात भारताच्या “बाह्य सुरक्षे”शी संबंधित लेखांचे संकलन करुन ते वाचकांपर्यंत आणले आहे. भारताच्या “अंतर्गत सुरक्षे”शी संबंधित लेखांचे संकलन ब्रिगेडिअर महाजन यांच्याच “आव्हान भारताच्या अंतर्गत  सुरक्षेचे” या पुस्तकात केले आहे. ही दोन्ही पुस्तके एकाचवेळी प्रकाशित झाली आहेत.

स्वत: युद्धभूमीवर शत्रूचा सामना केल्यामुळे त्यांच्या लिखाणात सुरक्षेविषयीची कळकळ आणि ढोंगी राजकारणाबद्दलची चिड जाणवते. त्यांचे लिखाण अत्यंत मोकळेपणाने आणि कोणतीही भीड न ठेवता केलेले असते. त्यामुळेच ते वाचकांना भावते. वातानुकुलित केबीनमध्ये बसून पत्रकारिता करणार्‍या किंवा दूरदर्शन चॅनेलवर भडकाऊ चर्चा करणार्‍या पत्रकार आणि नेत्यांपेक्षा प्रत्यक्ष सीमारेषेवर जवानांचे नेतृत्त्व केलेल्या एका सेनाधिकार्‍याने सत्ताधार्‍यांना सुनावलेले खडे बोलही वाचकाला आपलेसे वाटतात.

प्रकाशक
मराठीसृष्टी
९८२०३१०८०३
support@marathisrushti.com

लेखक
ब्रिगेडियर हेमंत महाजन