गांधीपर्व

लेखक : गोविंद तळवलकर ; 1937 ते 1947 या दशकात काँग्रेसचेच नव्हे तर सर्व भारताचे राजकारण कशा रीतीने चालत होते याचा तळवलकर यांनी या द्विखंडात्मक ग्रंथात जागतिक संदर्भात ऊहापोह केला आहे. […]

चैत

लेखक : द तु पाटील ; ‘चैत’ ही ग्रामदेवतेची यात्रा. ती चैत्र महिन्यात येते म्हणून ‘चैत’ नावाने ओळखली जाते.यात्रेसाठी आलेल्या लेकीबाळी, आईवडिलांबरोबरचे त्यांचे हितगुज आणि नातवंडांनी भरून राहिलेल्या घराचं चित्रण इथे येते. तसेच घराबाहेर अनुभवाला येणाऱ्या जीवनाच्या गुंतागुंतीचं चित्रण इथे व्यापक पातळीवर भेटतं. […]

तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता

लेखक : यशवंत मनोहर ; ‘तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता’ शोषणाची सर्व हिंस्र सत्ताकेंद्रे आणि त्यांची पायाभूत तत्त्वज्ञानेही उद्ध्वस्त करते. वर्चस्ववादी सत्ताकेंद्रांची चाकरी करणाऱ्या चैतन्यवादी भाषेचा तुरुंगही ही कविता तोडते आणि पूर्ण लौकिकतावादी सर्जक भाषेची निर्मिती करते, हा या कवितेचा मूल्यसंग्राम अनन्य असाच आहे. […]

मुक्या वेदना बोलक्या संवेदना

लेखिका :  डॉ. विनया जंगले ; पशुवैद्यकी ही व्यवसायाची चाकोरीबाह्य दिशा निवडून मुक्या प्राण्यांची सेवा करणं हे आयुष्याचं ध्येय मानणाऱ्या विनया जंगले… त्यांचं स्वानुभवांवर आधारित ‘मुक्या वेदना, बोलक्या संवेदना’ हे आगळं पुस्तक. […]

निद्रानाश

लेखक : महेश केळुसकर ; समकाळाची तल्खली आणि अस्तित्वप्रश्नांची पिंजण चालू ठेवणारी निद्रानाशमधील कविता जाग्रणासारखी आपल्याला चढत जाते. ‘निद्रानाश’मधील कवितेची जातकुळी भारतीय कवितेच्या आध्यात्मिक आणि लोकपरंपरेशी स्वत:ला जोडून ठेवणारी आहे. […] […]

तारकर्ली

लेखक : मधु मंगेश कर्णिक ; कोकणच्या मातीवर पोसलेली, त्या मातीशी इमान राखणारी आणि तिच्याशी एकजीव झालेली मधु मंगेश कर्णिक या ज्येष्ठ लेखकाची प्रतिभा… […]

भरून आलेले आकाश

लेखक : द. भा. धामणस्कर ; या संग्रहातील कविता प्रामुख्याने मौज, दीपावली, गंधाली, कालनिर्णय सांस्कृतिक, कविता-रती या अंकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या. […]

उगम

लेखिका : मोनिका गजेंद्रगडकर ; नारवक्कम हे दक्षिणेतलं, समुद्रकिनाऱ्यावरचं चर्चेस, मंदिर-गोपुरांचं वाऱ्यावर झुलणारं, हिरवंशार छोटंसं गाव. ते नुसतं गावच नाही तर सरवणा आणि व्हिक्टर या बालमित्रांच्या अबोध मैत्रीचा हा आरंभ-रुजवात आहे. चर्चचे ग्रेव्हयार्ड, त्याच्या बाजूच्या उपसागरावरच्या रेल्वेब्रिजवरून दूरवर जाताना दिसणारी गाडी, हा या कथेचा मर्माचा संकेत. […]