उगम

250.00

पुस्तकाचे नाव : उगम
लेखिका : मोनिका गजेंद्रगडकर
किंमत : २५०/
पाने : २३६
प्रकाशक : मौज प्रकाशन
ISBN : ९७८-९३-५०९१-१०७-५
बाइंडिंगचा प्रकार : परफेक्ट बायंडिंग

वर्गवारी : कादंबरी

पुस्तकाचा संक्षिप्त परिचय :

नारवक्कम हे दक्षिणेतलं, समुद्रकिनाऱ्यावरचं चर्चेस, मंदिर-गोपुरांचं वाऱ्यावर झुलणारं, हिरवंशार छोटंसं गाव. ते नुसतं गावच नाही तर सरवणा आणि व्हिक्टर या बालमित्रांच्या अबोध मैत्रीचा हा आरंभ-रुजवात आहे. चर्चचे ग्रेव्हयार्ड, त्याच्या बाजूच्या उपसागरावरच्या रेल्वेब्रिजवरून दूरवर जाताना दिसणारी गाडी, हा या कथेचा मर्माचा संकेत.

व्हिक्टरच्या मृत्यूने ही कथा अधिकच गहिरी होते आणि पाण्याला स्वत:चा ओघ मिळावा, तशी मुंबईसारख्या अजस्र महानगरात, मदर सिल्व्हियांमधल्या आईपणाच्या उद्भवात जाणतेपणाने मिसळून अथांग होत जाते. कादंबरीचे हे दोन आरंभबिंदू असे जोडले जातात. स्त्रीच्या सृजनाच्या अद्भुत ताकदीचा नि दुसरीकडे माणसाच्या मुळांचा ठाव घेत, अपार करुणेने त्याच्या मनाचाही तळ शोधणारी ही कादंबरी. ही कादंबरी माणूसपणाची बीजं पेरणारा म्हणून धर्म या संकल्पनेचा एक वेगळा अर्थही लावू पाहते.

स्वत:ला कथाकार म्हणून सिद्ध केल्यावर आलेली मोनिका गजेंद्रगडकर यांची ही वेगळ्या वाटेनं जाणारी कादंबरी, त्यांची कादंबरीकार म्हणूनही ओळख दृढ करेल, असा विश्वास व्यक्त करणारी…

— आशा बगे

Description

पुस्तकाचे नाव : उगम
लेखिका : मोनिका गजेंद्रगडकर
किंमत : २५०/
पाने : २३६
प्रकाशक : मौज प्रकाशन
ISBN : ९७८-९३-५०९१-१०७-५
बाइंडिंगचा प्रकार : परफेक्ट बायंडिंग

वर्गवारी : कादंबरी

Additional information

Pages

236

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “उगम”

Your email address will not be published. Required fields are marked *