A Methodical English Grammar
₹495.00
विविध कारणांसाठी इंग्रजी भाषा चांगल्या रीतीने लिहिता-बोलता येणं महत्त्वाचं आहे. स्पर्धा परीक्षा, नोकरीसाठी मुलाखत देणं इ. हे महत्त्व लक्षात घेऊन जी. डी. मोरे यांनी ‘A Methodical English Grammar’ हे पुस्तक लिहिलं. मोरे हे स्वत: इंग्रजीचे अध्यापक आहेत. विद्यार्थाना इंग्रजी शिकवताना त्यांनी नवनवीन प्रयोग केले आणि त्या प्रयोगांचा परिपाक म्हणजे हे पुस्तक.
लेखक : जी. डी. मोरे
किंमत : रु. ४९५/-
पाने : ५४८
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
ISBN : 9788177665161
वर्गवारी : व्याकरणविषयक
सातवी आवृत्ती
Description
लेखक : जी. डी. मोरे
किंमत : रु. ४९५/-
पाने : ५४८
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस
ISBN : 9788177665161
वर्गवारी : व्याकरणविषयक
सातवी आवृत्ती
इंग्रजी भाषेचा समग्र आणि सोदाहरण घेतलेला वेध
विविध कारणांसाठी इंग्रजी भाषा चांगल्या रीतीने लिहिता-बोलता येणं महत्त्वाचं आहे. स्पर्धा परीक्षा, नोकरीसाठी मुलाखत देणं इ. हे महत्त्व लक्षात घेऊन जी. डी. मोरे यांनी ‘A Methodical English Grammar’ हे पुस्तक लिहिलं. मोरे हे स्वत: इंग्रजीचे अध्यापक आहेत. विद्यार्थाना इंग्रजी शिकवताना त्यांनी नवनवीन प्रयोग केले आणि त्या प्रयोगांचा परिपाक म्हणजे हे पुस्तक.
ध्वनिचिन्हे – उच्चार व आघात, नामे, सर्वनामे, विशेषणे, क्रियापदे, काळ, काळांचे उपयोग, क्रियाविशेषणे, युक्तरूप, कृदन्त, धातुसाधित नाम, शब्दयोगी अव्यये, रचना, वाक्यरूपान्तर, वाक्यखंड, वाक्यसंयोग, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कथन, भाषालंकार, शब्दसिद्धी, विरामचिन्हे याबाबत सविस्तर विवेचन या पुस्तकात केलं आहे. तसेच हे पुस्तक कसे अभ्यासावे, लिप्यंतर याविषयीही माहिती दिली आहे. या पुस्तकातील सर्व exercise ची उत्तरे शेवटी दिली आहेत. इंग्रजी हा विषय अनेक सोप्या उदाहरणांच्या मदतीने सुलभ व रोचक करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे.
इंग्रजीमध्ये विभक्तीचे कार्य prepositions (शब्दयोगी अव्यय) कशी करतात याचं सविस्तर आणि सोदाहरण विवेचन मोरे यांनी केलं आहे. त्यासाठी त्यांनी ३२ पानं खर्ची घातली आहेत. Phonetic Symbols Key To Pronunciation And Stress (ध्वनिचिन्हे, उच्चार व आघात) हे प्रकरण, या पुस्तकाचं वेगळेपण दर्शवतं. शिवाय लेखकाने केलेला सूत्रांचा वापर हा भाग महत्त्वाचा आहे. लेखकाने स्वत: सूत्रे तयार केली आहेत. या सूत्रांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि मुलं इंग्रजीचा अचूक वापर करण्यास शिकतील. या पुस्तकाची प्रस्तावनाही अभ्यासपूर्ण आहे.
हे पुस्तक वाचून विद्यार्थाच्या मनामध्ये इंग्रजीविषयी गोडी निर्माण होईल. शाळा-ज्युनियर कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थिनी व विशेषकरून स्पर्धात्मक परीक्षार्थी व इंग्रजीचे अभ्यासक, इंग्रजीचे शिक्षक या सर्वांना या पुस्तकाचा उपयोग होईल आणि यापूर्वीही अनेकांना या पुस्तकाचा उपयोग झाला असेल; कारण या पुस्तकाची ही सातवी आवृत्ती आहे. व्याकरणासारख्या पुस्तकाची सातवी आवृत्ती प्रकाशित होणं, हे नक्कीच प्रशंसनीय आहे.
— अंजली पटवर्धन
Additional information
Pages | 548 |
---|
Reviews
There are no reviews yet.