निद्रानाश

निद्रानाश

पुस्तकाचे नाव : निद्रानाश
लेखक :  महेश केळुसकर
किंमत : १३०/-
पाने :  ८४
प्रकाशक : मौज प्रकाशन
ISBN : ९७८-९३-५०९१-१८५-३
बाइंडिंगचा प्रकार : परफेक्ट बायंडिंग

वर्गवारी : कविता संग्रह

पुस्तकाचा संक्षिप्त परिचय :

समकाळाची तल्खली आणि अस्तित्वप्रश्नांची पिंजण चालू ठेवणारी निद्रानाशमधील कविता जाग्रणासारखी आपल्याला चढत जाते.

वाच्यार्थाच्या पलीकडे जाऊन समकालीन जगण्यासंबंधी मर्मदृष्टी देणारी ही कविता, आजघडीच्या मराठी कवितेत स्वमुद्रा नोंदवून एकूणच मराठी कवितेला पुढे नेणारी आहे.

सर्व स्तरांवरील शोषणव्यवस्थेला आव्हान देणारी, तीव्र भावनात्मक आणि वैचारिक अस्वस्थता निर्माण करणारी, सार्वत्रिक दंभाला नागडं करणाऱ्या 'निद्रानाश'मधील कवितेची जातकुळी भारतीय कवितेच्या आध्यात्मिक आणि लोकपरंपरेशी स्वत:ला जोडून ठेवणारी आहे. तिचा जन्मजात साधेपणा हीच तिच्या अस्सलतेची ऊर्जाखूण आहे.

प्रकाशकाचा संपर्क : 

मौज प्रकाशन, मुंबई

मौज डिजिटल
१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट
म्युनिसिपल मार्केटच्या वर
विलेपार्ले (प), मुंबई

इ-मेल : moujdigital@gmail.com
दूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९