मलेरिया – कारणे आणि उपाय

मलेरिया

कारणे आणि उपाय

लेखक : डॉ. अविनाश वैद्य
किंमत : रु.१००
पाने : ८४
प्रकाशक : फ्लायवेल पब्लिकेशन
ISBN : 978- 81- 923277-3-0
बाइंडिंगचा प्रकार : 
वर्गवारी : आरोग्यविषयक

मलेरिया या रोगामुळे दरवर्षी भारताला जवळजवळ ४०,००० कोटी रुपयांचा फटका बसतो. याशिवाय मलेरिया निर्मूलनासाठी होणारा खर्च वेगळाच. एका आकडेवारीनुसार २०१० साली जवळजवळ १६ कोटी भारतीय नागरिक मलेरियाने पीडित होते. आज अंदाजे ८० टक्के भारतीय जनता मलेरियाच्या धोकादायक विभागांमध्ये राहत आहे, ही सत्यता  अणुबॉंम्ब सारखी भीतीदायक नाही का?

अशा या मलेरिया संबंधित सविस्तर, सहज समजू शकेल अशी माहिती डॉ. अविनाश वैद्य यांच्या या पुस्तकात मिळते.

- डॉ. प्रसाद मोडक
प्राध्यापक आयआयटी मुंबई, पर्यावरण सल्लागार
( जागतिक बँक, आशियाई विकास बँक आणि युनोचा पर्यावरण कार्यक्रम )

आधुनिक वैद्यक तंत्रज्ञान आणि भारतीय अर्थव्यवस्था यांत खूप सुधारणा झाल्या असूनही एका परीनं अगदी क्षुल्लक अशा मलेरिया या रोगामुळं लाखो माणसं भारतात मरतात. या विदारक गोष्टीचं शास्त्रीय विश्लेषण डॉ. अविनाश वैद्य यांनी या पुस्तकात केलं आहे. पुस्तक वाचल्यावर मलेरिया का होतो, तो कसा पूर्णपणे नाहीसा करता येतो, इत्यादी गोष्टी डॉ. वैद्य यांनी पुराव्यांनिशी या पुस्तकात मांडल्या आहेत. त्या इतक्या स्वच्छ आहेत की आपल्या देशातून या रोगाची हकालपट्टी का होत नाही असा बाळबोध प्रश्न पडतो आणि त्या प्रश्नाचे उत्तरंही मिळतात.

- निळू दामले
लेखक, पत्रकार