जागत्या स्वप्नाचा प्रवास

जागत्या स्वप्नाचा प्रवास

पुस्तकाचे नाव : जागत्या स्वप्नाचा प्रवास
लेखक :  डॉ. आनंद बोबडे
किंमत :  इ-बुक केवळ रु.१००/- , छापील आवृत्ती रु.४००/-
पाने : ४८० (डबल क्राऊन)
प्रकाशक : मराठीसृष्टी
ISBN :
बाइंडिंगचा प्रकार : Hard bound
वर्गवारी : व्यक्तीचित्र, क्रिडा

डबल क्राऊन आकाराच्या तब्बल ४८० पानांचा भरगच्च खजिना असलेल्या या पुस्तकात सुमारे १२५ हून जास्त पानांची सांख्यिकी माहिती दिलेली आहे हे या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्ट्य. खर्‍या अर्थाने या पुस्तकाला सचिन-कोश असेच म्हणता येईल. मूळ किंमत रु.७००/- असलेल्या या तब्बल ४८० पानी पुस्तकात सचिनच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यापासूनचा प्रवास टिपलाय डॉ. आनंद बोबडे या क्रिकेटवेड्या अवलियाने. सचिन संदर्भातल्या शेकडो व्हिडिओ लिंक्स हे या इ-बुकचं आणखी एक आकर्षण आहे.

हे पुस्तक कोणत्याही क्रिकेट रसिकाला आपल्या संग्रही ठेवावेसे वाटेलच. सचिनच्या मैदानावरच्या प्रत्येक विक्रमाची नोंदही या पुस्तकात आहे. आपल्याला माहित नसलेल्या अनेक बाबी या पुस्तकातून आपल्यासमोर येतात.

प्रकाशकाचा संपर्क :
मराठीसृष्टी
९८२०३१०८०३
support@marathisrushti.com