गाथा स्त्री शक्तीची

Gatha-Stri-Shaktichi-front-300

गाथा स्त्री शक्तीची (आकाशवाणीवरील नभोनाट्ये)
लेखिका
: माधवी घारपुरे
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : २००/- रुपये
पाने : १८३

स्त्रीची ताकद तिच्या आत्मिक बळांत आहे. आत्मबळाचा शोध तिनं एकदा घेतला की मग ती कोणाचीच राहात नाही. सर्व प्रकारच्या परिस्थितींना सामावून घेत ती आयुष्याला नवं परिमाण देते.

असंच आयुष्याला परिमाण देणार्‍या १३ स्त्रियांच्या अफाट कर्तृत्त्वाचा पट या पुस्तकाच्या रुपाने पुढे येत आहे.

महिला सक्षमीकरण या सामाजिक प्रबोधनावर ही नभोनाट्ये आधारित आहेत. या सर्व नाटकांमध्ये एक सृजनशील सूत्र आणि नकळत जाणवणारी लय सापडते आणि हे या लिखाणाचं आणि आणि म्हणूनच सगळ्या नाट्यांचं बलस्थान ठरलं. या सगळ्याच्या पलिकडे अत्यंत खडतर आयुष्य जगत असताना, पुरुषप्रधान संस्कृतीचं वर्चस्व असणार्‍या समाजात स्वत:चं माणूसपण सिध्द करत समाजासाठीच झटणार्‍या या सगळ्या स्त्रिया, ज्यांच्यामुळे सामान्य स्त्रियांना जगण्यासाठी बळ मिळेल.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*