चैत

चैत

पुस्तकाचे नाव : चैत
लेखक : द तु पाटील
किंमत : २२५/-
पाने :  १३२
प्रकाशक : मौज प्रकाशन
ISBN : ९७८-९३-५०९१-१९६-९
बाइंडिंगचा प्रकार : परफेक्ट बायंडिंग

वर्गवारी : कादंबरी

पुस्तकाचा संक्षिप्त परिचय :

'चैत' ही ग्रामदेवतेची यात्रा. ती चैत्र महिन्यात येते म्हणून 'चैत' नावाने ओळखली जाते. इथे ओढाताणीची स्थिती असलेले, स्वभावाने गरीब, सच्चे असे कुटुंब मध्यवर्ती आहे. यात्रेसाठी या कुटुंबात आलेल्या लेकीबाळी, आईवडिलांबरोबरचे त्यांचे हितगुज आणि नातवंडांनी भरून राहिलेल्या घराचं चित्रण इथे येते. तसेच घराबाहेर अनुभवाला येणाऱ्या जीवनाच्या गुंतागुंतीचं चित्रण इथे व्यापक पातळीवर भेटतं.

यात्रेत कापली जाणारी बकरी, पै-पाहुण्यांनी भरलेला गाव, भरलेला बाजार, बैलगाड्यांची मिरवणूक, तमाशाचा तंबू, कुस्तीचं मैदान या सर्व चित्रणांतून लोकजीवनातला लोकोत्सव इथे समर्थपणे व्यक्त होतो.

जागतिकीकरणानंतर गावे बकाल होऊ लागली. शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडू लागला. खाजगी सावकारी वाढीस लागली. या स्थितीकडे ही कादंबरी लक्ष वेधते. चित्रमय निवेदन शैली आणि बोलीभाषेतील प्रांजळ संवाद हा या कादंबरीचा विशेष सांगता येईल. अस्सल बोलीभाषेचा अनुभव इथे वाचकाला मुग्ध करील.

लेखकाचे हे पहिलेच पुस्तक 'मौज'च्या परंपरेत सामावणारे आहे.

प्रकाशकाचा संपर्क : 

मौज प्रकाशन, मुंबई

१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट
म्युनिसिपल मार्केटच्या वर
विलेपार्ले (प), मुंबई

इ-मेल : moujdigital@gmail.com
दूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९