विजक्का

“विजक्का” हे पुस्तक लेखक विनायक आनिखिंडी यांच्या epilepsy किंवा फिट येणे या आजाराने ग्रस्त आणि वयानुसार बुद्धीची वाढ न झालेल्या सख्या बहिणी च्या जीवनाची आणि त्याच्या सामाजीक, कुटुंबिक पैलू असलेली अतिशय हृदयस्पर्शी  कहाणी आहे. […]

अंतःस्वर

रमा नामजोशी यांचा अंतःस्वर हा पहिलाच कवितासंग्रह आहे. एखादी अभिव्यक्ती वा नवनिर्मिती आपल्या जीवनाचे सारतत्व घेऊनच येत असते… सदर कवितासंग्रहात कवयित्रीचा अंतःस्वर… तिचा आतला आवाज… मुखरित झालेला आहे. तिचं हे प्रस्फुटित होणं… अत्यंत परिपक्व स्वरूपाचं आहे. जीवनाकडे बघण्याच्या तिच्या दृष्टिकोनात परिपक्वता आहे. समंजस दृष्टी आहे.  […]

पर्याय शब्दकोश

एखादा लेख लिहिताना किंवा पत्र लिहितानाही समर्पक शब्द शोधण्यासाठी नुसता त्या त्या शब्दांचे अर्थ सांगणारा किंवा समानार्थी शब्द सांगणारा कोश उपयोगी पडत नाही. तर त्याच अर्थच्छटेचे विविध पर्याय वाक्प्रचार व म्हणींसह सांगणाऱ्या कोशाची आवश्यकता असते. ती आवश्यकता ओळखून वि.शं. ठकार यांनी ‘पर्याय शब्दकोश’ सिद्ध केला आहे. […]

नागकेशर

ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांची ‘नागकेशर ही कादंबरी मराठी साहित्यविश्वात दाखल झाली आहे. त्यांच्या अन्य कादंबऱ्यांप्रमाणेच बहुपेडी असं कथासूत्र लाभलेली आणि उत्कंठावर्धक वळणांनी पुढे सरकरणारी ही कादंबरी आहे. […]

रेल्वेची रंजक सफर

लेखक : डॉ. अविनाश वैद्य ; रेल्वे प्रवासाच्या आवडीने झपाटलेल्या एका मुशाफिरानं अनुभवलेली आणि सांगितलेली ही रेल्वेची रोचक, रंजक अन् विस्मयकारक कहाणी. […]

मलेरिया – कारणे आणि उपाय

लेखक : डॉ. अविनाश वैद्य ; आधुनिक वैद्यक तंत्रज्ञान आणि भारतीय अर्थव्यवस्था यांत खूप सुधारणा झाल्या असूनही एका परीनं अगदी क्षुल्लक अशा मलेरिया या रोगामुळं लाखो माणसं भारतात मरतात. या विदारक गोष्टीचं शास्त्रीय विश्लेषण डॉ. अविनाश वैद्य यांनी या पुस्तकात केलं आहे. […]

पाऊले चालती – एक जीवनानुभव

लेखक :  मा य गोखले ; अथक परिश्रमांची तयारी, गुणग्राहक व चैतन्यशील वृत्ती, चोख व्यवहार आणि शिस्तबद्ध कार्यशैलीच्या जोडीला समन्वयशील स्वभाव, कुशाग्र बुद्धिमत्ता अशा बहुविध व्यक्तिमत्त्वाचे म्हणजे ग्रंथलेखक श्री मा य गोखले यांचे विविध पैलू उलगडून दाखविणारे हे जीवनानुभव म्हणजे एक प्रदीर्घ कादंबरीच आहे. […]

जागत्या स्वप्नाचा प्रवास

लेखक : डॉ. आनंद बोबडे ; सचिनच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यापासूनचा प्रवास टिपलाय डॉ. आनंद बोबडे या क्रिकेटवेड्या अवलियाने.  […]

गांधीपर्व

लेखक : गोविंद तळवलकर ; 1937 ते 1947 या दशकात काँग्रेसचेच नव्हे तर सर्व भारताचे राजकारण कशा रीतीने चालत होते याचा तळवलकर यांनी या द्विखंडात्मक ग्रंथात जागतिक संदर्भात ऊहापोह केला आहे. […]

1 2 3 4