गांधीपर्व

गांधीपर्व

Gandhiparva by Govind Talwalkar

पुस्तकाचे नाव : गांधीपर्व
लेखक : गोविंद तळवलकर
किंमत : रु.५५०
पाने :  ३६५
प्रकाशक : मौज प्रकाशन गृह
ISBN : 978-93-5091-135-2
बाइंडिंगचा प्रकार : परफेक्ट बायंडिंग

वर्गवारी : चरित्र

पुस्तकाचा संक्षिप्त परिचय :

श्री. गोविदराव तळवलकर हे सव्यसाची लेखक, व्यासंगी संशोधक , अभिजात व द्रष्टा इतिहासकार, प्रभावी व द्रष्टा संपादक म्हणून सुविख्यात होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या 1937 ते 1947 या दशकातील इतिहासासंबंधी कागदपत्र टुवर्डस् फ्रीडम या ग्रंथमालेत प्रसिध्द केले आहेत. या  दशकात काँग्रेसचेच नव्हे तर सर्व भारताचे राजकारण कशा रीतीने चालत होते याचा तळवलकर यांनी गांधीपर्व या द्विखंडात्मक ग्रंथात जागतिक संदर्भात ऊहापोह केला आहे. महात्मा गांधींचा प्रभाव वाढत जाऊन काँग्रेसने राष्ट्रव्यापी लढा उभारला. काही अधिक पुरावा व पूरक मजकूर देऊन तळवलकरांनी या कालखंडाची वस्तुनिष्ठ, तौलनिक व सुबोध मीमांसा केली आहे.

आधुनिक भारताच्या राजकीय इतिहासावरील ग्रंथांत त्रिखंडात्मक सत्तांतर : 1947 तसेच नवरोजी ते नेहरू, नियतीशी करार, भारत आणि जग आणि द्विखंडात्मक गांधीपर्व या तळवलकर यांच्या ग्रंथांचे महत्व अनन्यसाधारण आहे. प्रवाह आणि प्रवृत्तींचे स्वरुप विशद करतानाच वेगळा विचारही करणे व यापुढील घटनांची व परिवर्तनासाठी काय केले पाहिजे याची कल्पना येणे हा अभिजात इतिहासकाराचा व द्रष्टेपणाचा मोठाच गुण या सर्व ग्रंथांत तसेच सोव्हिएत साम्राज्याचा उदय आणि अस्त या त्यांच्या चार खंडातील ग्रंथमालेत व बदलता युरोप इत्यादी ग्रंथांतही प्रत्ययास येतो. या सर्व ग्रंथांचे हिदीतील भाषांतर 'संवाद प्रकाशन' प्रसिद्ध करणार आहे.

प्रकाशकाचा संपर्क : 

मौज प्रकाशन, मुंबई

मौज डिजिटल
१ ला मजला, म्युनिसिपल इंडस्ट्रियल इस्टेट
म्युनिसिपल मार्केटच्या वर
विलेपार्ले (प), मुंबई

इ-मेल : moujdigital@gmail.com
दूरध्वनी : (०२२) २६१२ ३४७९