हिमशिखरांच्या सहवासात

हिमशिखरांच्या सहवासात
लेखक : प्रकाश लेले
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १८०/- रुपये
पाने : १५०

लेखक एम.टी.एन.एल. मध्ये अधिकारी होते. त्यांना हिमालयात पायी फिरण्याचा छंद होता. पायी जात असताना निसर्गाचं रम्य दर्शन, बर्फाच्छादित शिखरं, वन्य प्राणी, विविध रंगाची फुलं, वनौषधीची झाडं यांचा त्यांना परिचय झाला. गंगोत्री, यमनोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ या धार्मिक स्थळांना भेट देताना त्याचे पुराणातील संदर्भ त्यांनी दिले आहेत. निसर्गाचं विराट रुप त्यांना सतत आकषिर्त करीत होतं तर जिम कार्बेटचं जंगल जीवन त्यांना शीळ घालीत होतं. वन्यप्राण्यांच्या विशेषत: वाघाच्या शिकारीवर निर्बंध घालणार्‍या जिम कार्बेटला ते सलाम करतात. त्या सर्व ठिकाणांची पुराणाचा आधार घेऊन केलेली वर्णनं मनाला मोहवून टाकतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*