नवीन लेखन...

झेंडूची फुले

माझे फुले आणि आरोग्य हे पुस्तक २००७ साली प्रकाशीत झालेले आहे.  या पुस्तकातील माहीती व लोकांनी सांगितलेले अनुभव खाली देत आहे.

झेंडू (नारिंगी किंवा पिवळा ):

झेंडूच्या फुलाच्या पाण्याने खोकला जातो. मला याचा खूप फायदा झाला व होत आहे.

* मुंबई च्या  सौ ठाकूर ह्यांनी मला बुधवारी संध्याकाळी फोन करून सांगितले की त्यांचे मुलाचे (वय ६) लघवी तुंबण्याचे ऑपरेशन करायचे आहे. पण गेले महिनाभर त्याचा खोकला थांबत नाही. डॉक्टरांची औषध चालू आहेत उपयोग नाही व खोकला आला की त्रास होतो. डॉक्टर खोकला थांबल्याशिवाय ऑपरेशन करायला तयार नाहीत. काहीतरी औषध सांगा. मी त्यांना विचारले मुंबईत तुम्हाला झेंडू चे फुल मिळेल का? त्या हो म्हणाल्या. मी त्यांना सांगितले, आज एक फुल आणून त्याच्या पाकळ्या एक भांडेभर पाण्यात भिजत घाला, उद्या सकाळी पाकळ्या बाजूला करून ४-४ चमचे पाणी ४-५ वेळा दया. व हे पाणी चालू ठेवा शुक्रवारी संध्याकाळी ४:३० ला फोन आला की मुलाचा खोकला थांबला , मुलाचे ऑपरेशन ठरविले आहे. (लहान मुलांना हे पाणी देतांना त्यात चवीसाठी थोडी साखर घातली तरी चालते.

* माझे मित्र श्री संजय विश्वास हे मुंबई ची तीन दिवसांची ट्रीप करून आले. मी त्यांना फोन केला तेव्हा ते  खूपच खोकत होते, म्हणून त्यांना झेंडूचे पाणी घेण्यास सांगितले, ते त्यांनी घेतले.  परत दुसरे दिवशी फोनवर बोलण्याचा योग्य आला त्यावेळी खोकला नव्हता.

* ‘मी निर्माल्य औषध’ म्हणून लेख प्रसिद्ध केला. तो वाचून एक ७२ वर्षाच्या गृहस्थानी फोन  करून सांगितले की मला गेली २५ वर्षे खोकला होता, तुमच्या लेखा प्रमाणे झेंडूचे पाणी घेतले व माझा खोकला आता थांबला आहे.

* झेंडूच्या पाण्यानी डोळे धुतले असता डोळ्यातील पाणी, कफ घट्ट होतो व बाहेर पडतो व दिसण्यात सुधारणा होते.

* मला स्वयंपाक करताना फोडणीचे गरम तेलाचे थेंब हातावर पडून भाजले. आग खूप होत होती. त्यावर मी झेंडूचे फुलाचे पाणी थोडेसे चोळले. १५ मिनिटात आग थांबली. २ तासांनी मी भाजले आहे हे विसरलोसुद्धा. दुसरे दिवशी फोड आले नाहीत.

माझा मित्र अरविंद जोग याला कफाचा त्रास होता. म्हणून मी त्याला झेंडूचे पाणी घेण्यास सांगितले, त्याला खूप फायदा झाला. त्याचे मित्र कॅप्टन विनायक जोशी यांना कफ व खोकल्याचा त्रास झाला, एक्सरे काढल्यावर डॉक्टरांनी सांगितले पूर्ण छाती कफाने भरली आहे. जास्त कफ वाढल्याने ब्रॉन्कायटिस होई, जोग ने त्यांना झेंडूचे पाणी घेण्यास सांगितले. जोगवर विश्वास ठेऊन त्यांनी पाणी चालू केले. चार दिवसात कफ कमी झाला. ह्या दिवसात त्यांचे सिगरेट ओढणे चालूच होते. एक महिन्याने जोग च्या सांगण्यावरून पुन्हा एक्स रे काढला, तेव्हा डॉक्टर म्हणाले, तुम्हाला कोणी सांगितले ब्रॉन्कायटिस. अहो छाती तर एकदमच क्लीअर आहे. जोशींनी त्यांना त्यांच्याच हॉस्पिटलचा आधीचा एक्स रे दाखवला. डॉ ‘ह्याप्रमाणे बरोबर आहे. तुम्ही काय केलेत,’ ‘एक घरगुती औषध’ (जोशींनी झेंडूच्या पाण्याबद्दल सांगितले नाही).

वैद्य अरविंद जोशी
+९१९४२१९४८८९४

Avatar
About अरविंद जोशी 41 Articles
अरविंद जोशी हे naturopathy & pranik healing चे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचा फुलांवरही खूप अभ्यास आहे. ४० वर्षाचा त्यांचा अनुभव आहे. आज वयाची ७० वर्षें असुनही मुद्दाम what's app शिकून घेतले आहे. सेवाभाव म्हणून ते WhatsApp ग्रुपसाठी काम करतात.

2 Comments on झेंडूची फुले

  1. महोदय,
    सदर पुस्तक दुकानात7 उपलब्ध होत नाहीए,कुठे मिळू शकेल याबाबत काही सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..