नवीन लेखन...

WhatsApp च नवं फिचर “रिड रिसिप्ट”

Hello Friends,

आजपासुन मी येथे लेख सुरू करत आहे. मला खात्री आहे की माझा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल.

Now back to the Work.

तुम्हाला WhatsApp ची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता नाही. WhatsApp ने नुकत्याच प्रसारीत केलेल्या जाहिरनाम्यात भारतात त्यांचे ७० मिलीअन म्हणजेच जवळपास ७ कोटि युसर्स आहेत. आज बहुतेकांकडे स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे WhatsApp नसलेला स्मार्ट फोन मिळणे कठीणच!

तर या आपल्या आवडत्या मॅसेंजर App मध्ये एक नविन फिचर अपडेट होणार आहे आणि हे फिचर जरा हटके आहे. म्हणजे बघा काहीवेळा असे होते की तुम्ही तुमच्या मित्राला WhatsApp वर message पाठवता पण तो message वाचुनही वाचला नाही असं सांगतो. मग कारण देताना message डाऊनलोड झाला पण मी वाचला नाही, किंवा कामात होतो म्हणुन उशिरा वाचला वगैरे थापा मारतो. पण आता हे शक्य नाही.

WhatsApp च्या नविन फिचरमुळे तुम्हाला आता तुमच्या मित्राने message वाचला कि रिड रिसिप्ट मिळणार आहे. हो हे खरयं!!

WhatsApp वर एखादा message पाठवला कि त्याखाली एक टिकमार्क येतो. तो message मित्राच्या मोबाईलवर डाऊनलोड झाला कि दोन टिकमार्क दाखवतात. हे टिकमार्क राखाडी कलर मध्ये असतात. पण आता जर का तुमच्या मित्राने तो message वाचला असेल तर ते राखाडी टिकमार्कचे कलर बदलुन निळे होईल. जेणेकरुण तुम्हाला कळू शकेल कि तुमच्या मित्राने तो message वाचला आहे कि नाही.

म्हणजे आता थापा मारणा-या मित्रांनो सावधान! सावधान! सावधान!

WhatsApp च्या FAQ सेक्शन मध्ये यासंदर्भात अधिक माहिती दिली आहे. सध्यातरी हे फिचर फक्त Group Chat आणि Broadcast message साठी आहे. जेव्हा Group मधिल सर्व सभासद message वाचतील तेव्हा दोन्ही टिकमार्क निळे होईल.

© अभिजीत शिंदे

तुम्ही माझ्या BLOG ना ही भेट देऊ शकता.

http://comptechguru.wordpress.com/

http://mycomptechguru.blogspot.in/

— अभिजीत शिंदे उर्फ COMPTECHGURU (कॉम्पटेकगुरू)

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..