नवीन लेखन...

मराठी भाषेचे अुत्क्रांत स्वर

Vovels in Marathi Language

27 फेब्रुवारीच्या जागतिक मराठी भाषा दिवसानिमित्तानं….

सोपी मराठी … प्रवाही मराठी … अुत्क्रांत मराठी … समृध्द मराठी…. :: मराठी भाषेचे अुत्क्रांत स्वर

पारंपारिक स्वर : अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं (अुच्चार…अनुस्वार) अ: (विसर्ग, नेहमीचा सामान्य अुच्चार…. अहा..), ऋ (र्‍हस्व आणि दीर्घ. दीर्घ ऋ संगणकावर मला टाअीप करता आला नाही), लृ (र्‍हस्व आणि दीर्घ) असे अेकूण 16 स्वर आहेत.

इ ई उ ऊ ए ऐ या स्वरचिन्हांअैवजी अि, अी, अु, अू, अे अै ही चिन्हे स्वीकारावी.

आ, ओ, औ ही स्वरचिन्हे आपण आधीच स्वीकारली आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, सुमारे 85 वर्षांपूर्वी, भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली. त्यात थोडी लिपीशुद्धीही होती. त्यांची तर्कशुध्द विचारसरणी म्हणजे….क ला वेलांटी लावली तर ‘की’ होते आणि ते आपण स्वीकारलं आहे तर अ ला वेलांटी लावून ‘अि’ का स्वीकारू नये? त्यानुसार इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या चिन्हांबद्दल (अक्षरांबद्दल..स्वरांबद्दल..) अि, अी, अु, अू, अे अै ही चिन्हे स्वीकारावी.

आ, ओ, औ, अं ही स्वरचिन्हे आपण आधीच स्वीकारली आहेत. अशारितीनं अ ची बाराखडी जर आपण स्वीकारली तर, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या स्वरचिन्हांची आवश्यकता राहणार नाही.

गजानन वामनाचार्य
About गजानन वामनाचार्य 85 Articles
भाभा अणुसंशोधन केन्द्र, (BARC) मुंबई येथील किरणोत्सारी अेकस्थ आणि किरणोत्सारी तंत्रज्ञान विभागातून निवृत्त वैज्ञानिक. मराठीसृष्टीवरील नियमित लेखक. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी विज्ञान परिषदेच्या कामात स्वारस्य घेतले. मविप च्या पत्रिका या मुखपत्राच्या संपादक मंढळावर त्यांनी १६ वर्षं काम केलं. ७५,००० हून जास्त मराठी आडनावांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. आडनावांच्या नवलकथा यावर त्यांनी अनेक लेख लिहीले आहेत. बाळ गोजिरे नाव साजिरे हे मुलामुलींची सुमारे १६५०० नावं असलेलं पुस्तक त्यांनी २००१ साली प्रकाशित केलं आहे.
Contact: Website

1 Comment on मराठी भाषेचे अुत्क्रांत स्वर

  1. इंग्रजी dictionary मधे जवळपास ७०% शब्दांच्या उच्चारात अॅ किंवा आॅ हे स्वर/उच्चार आढळतात. उदा. action, traction, pack, knowledge, college, ox, fax, rock इत्यादी. पण मराठी किंवा संस्कृत भाषेमधे अॅ किंवा आॅ हे उच्चार असलेला एकही शब्द नाही… मराठी बाराखडीतही अॅ किंवा आॅ हे स्वर नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..