नवीन लेखन...

वास्तुशास्त्र पेंटिंग – लेखांक सहावा – हस्त नक्षत्र

वास्तुशास्त्र पेंटिंगमध्ये हस्त नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीचे संदर्भात काय काय लाभदायक असते ते या लेखात पाहू….

ही वास्तुशास्त्र पेंटिंग त्या व्यक्तीशी तसेच त्या व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्यांची इतक्या विविधपणे मुकसंवाद साधत असते की, जसं निरागस तान्ह बाळ, ज्याला बोलताही येत नसतं तरी त्याच्या भोवती ते बाळ साऱ्यांना प्रेमाची मोहिनी घालते.

एका घट्ट नात्यातते साऱ्यांना अखडवून टाकते. तद्वतच हे वास्तुशास्त्र पेंटिंग जेव्हा जेव्हा या नक्षत्रावर जन्मलेल्या आणि त्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या वास्तूत लावले जाते तेव्हा तीन ते सहा महिन्यात ते पेंटिंग त्या कुटुंबाच्या गळ्यातील ताईत बनते. सर्व कुटुंबीय त्याला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतात. असं काय घडतं ?  की, या प्रकारच्या वास्तुशास्त्र पेंटिंग द्वारे सकारात्मक बदल घडतात ?

आपण आता हस्त नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीच्या संदर्भात विचार करूया. या नक्षत्रावर आधारित कन्या राशीच्या व्यक्तीच्या वास्तूत असलेल्या एका वास्तुशास्त्र पेंटिंगचा प्रतिकात्मक म्हणुन विचार करूया. कन्या रास असल्यामुळे एका स्त्री आकाराचा स्वैर आणि स्वच्छंदी हालचालींचा आकार, रीठा वृक्ष, जाई-चमेली अन मालती या वेलींच्या पंचांगांचा आकारयुक्त अभ्यास, कन्येचा स्वामी बुध आणि नक्षत्रस्वामी सूर्यदेव आणि त्याची पहाट संधेची रूपे ज्याला सविता म्हणतात. त्यांचा रंग आकार, हस्ताचे पाच तारे या साऱ्यांचे आकार या वास्तुशास्त्र पेंटिंग मध्ये असतात. त्यांचं प्रमाण, आकारांचे इंचात असलेली प्रमाण, रंगांच्या छटांची तीव्रताया बाबी, वैयक्तिक त्या हस्त व्यक्तीशी संवाद साधून ठरविल्या जातात. ते आकार या वास्तुशास्त्र पेंटिंग मध्ये आहेत. या साऱ्या रंगाकारांनी बद्ध झालेल्या कलाकृतीमध्ये नक्षत्रस्वामी श्री सूर्य देवाचा  जप ओम सूर्यनारायणाय नमःकिंवा ओम सवितृ सूर्यनारायणाय नमः हा त्यातील अक्षरांचा पटीत हजाराने करावयास पाहिजे असतो. त्यामुळे त्या वास्तुशास्त्र पेंटिंग मधील रंगाकारांना एखाद्या सिद्ध बीज मंत्रा प्रमाणे शक्ती प्राप्त होते.

शीत रंगांसह पिवळा, ऑफ व्हाईट, हिरवा- हिरव्याच्या विविध शेड्स आणि तपकिरी रंगाचा प्रभाव असलेला नारिंगी या रंगांच्या यथायोग्य प्रमाणांचं महत्व शाबित ठेवून हे पेंटिंग बनविले जाते.

साऱ्यात सकारात्मक ऊर्जा मुळे त्या वास्तूत नकारात्मक ऊर्जा गाशा गुंडाळायला सुरुवात करते. तीन ते सहा महिने लागतात अद्भुत परिणाम अनुभवायला…!!

शुभं भवतु

प्रा. गजानन शेपाळ.

गजानन सिताराम शेपाळ
About गजानन सिताराम शेपाळ 22 Articles
श्री गजानन शेपाळ हे मुंबईच्या 'सर ज जी ऊपयोजित कला महाविद्यालया'त ज्येष्ठ अधिव्याख्याता आहेत. श्री शेपाळ हे एक विविधरंगी व्यक्तिमत्त्व आहे. खरंतर “रंग” हा त्यांच्या अभ्यासाचा आणि अध्ययनाचा विषय. सर्व सरकारी कार्यालयात दिसणारे महात्मा ज्योतिबा फुले यांचे चित्र ही त्यांचीच कलाकृती. याच कलाकृतीसाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..