नवीन लेखन...

राष्ट्रीय कॅलेंडरचा वापर

राष्ट्रीय कॅलेंडरची तारीख दररोज आकाशवाणी व दूरदर्शनवर प्रसारण सुरु होताना सांगितली जाते. प्रमुख वर्तमानपत्रांमध्येही आतल्या पानावर रोजचे पंचांग दिलेले असते. तिथेही भारतीय राष्ट्रीय सौर तारीख दिलेली असते. रिझर्व्ह बॅंकेच्या कॅलेंडरमध्येही या तारखांचा उल्लेख असतो. राष्ट्रीय सौर कॅलेंडरही काही संस्था प्रकाशित करु लागल्या आहेत. आपणही सौर कॅलेंडरचा वापर करु या. सुरुवात स्वतःपासून करु.

आपण हे करु शकता

१) राष्ट्रीय कॅलेंडर हे भारताचे अधिकृत कॅलेंडर असल्यामुळे बॅंकेच्या चेकवर आपण राष्ट्रीय तारीख लिहावी. ही तारीख रिझर्व्ह बॅंकेच्या परिपत्रकानुसार वैध असल्यामुळे कोणत्याही बॅंकेस तारखेच्या कारणावरुन चेक नाकारता येत नाही. बॅंकेतील कर्मचारी हा आपल्या प्रमाणेच राष्ट्रीय कॅलेंडरशी अपरिचित असल्यामुळे असा चेक परत केला जाऊ शकतो, परंतु कायद्याने तसे करता येत नाही. याविरुद्ध ग्राहक न्यायालयात दाद मागता येऊ शकते. अनेक व्यक्ती या तारखांचे चेक टाकू लागल्या आहेत त्यामुळे बँकाही जागरूक आहेत. परंतु बँकेमध्ये राष्ट्रीय तारखेचे भरपूर चेक गेल्याशिवाय ही तारीख रूढ होणार नाही. बँकेलाही त्यामुळे संगणकीय प्रणालीत या तारखेचा समावेश करावा लागेल.

२) चेक खेरीज पत्रव्यवहार, डायरी, इत्यादी ठिकाणी जिथे तारखेचा संबंध येतो अशा कागदपत्रांवर इंग्रजी तारखेबरोबर राष्ट्रीय सौर तारीख अवश्य लिहावी.

३) ग्राहक पंचायतीच्या कॅलेंडरमध्ये जशा सौर तारखा समाविष्ट केल्या आहेत. त्याप्रमाणे इतर संस्था, बँकांच्या कॅलेंडरमध्येही या तारखा समाविष्ट करण्याचा आग्रह विनंती करता येईल.

४) शाळा संहितेच्या नियमानुसार शाळेच्या जनरल रजिस्टर मध्ये विद्यार्थ्यांची जन्मतारीख इंग्रजी आणि राष्ट्रीय सौर दिनदर्शिकेप्रमाणे लिहावी असा स्पष्ट उल्लेख आहे, आपण याबाबत प्रयत्न केले पाहिजेत.

राष्ट्रीय सौर कॅलेंडर चा वापर आपण भारताचे नागरिक म्हणून केला पाहिजे, तो आपला अधिकार आहे. त्यासाठी स्वतः पासून सुरुवात करुया. लोक व्यवहारात राष्ट्रीय कॅलेंडर रुजण्यासाठी संघटित प्रयत्न करावे लागतील.

यासंबंधीची सविस्तर माहिती मिळावी, म्हणून एक पावर पॉइंट प्रेझेंटेशनही लेखकाने तयार केले आहे. निरनिराळ्या ठिकाणच्या ग्राहक पंचायतीच्या गटांनी यावर चर्चात्मक कार्यक्रम अवश्य ठेवावा.

आपण स्वतः या तारखेचा वापर करीत असाल तर किंवा करू इच्छित असाल तर आपले नाव व संपर्क पत्ता लेखकाकडे अवश्य कळवावा. सांघिक प्रयत्नांसाठी अशा व्यक्तींची माहिती एकत्रितपणे उपलब्ध होणे आवश्यक आहे.

( फोन संपर्क : ०२१५१-२३१९०१४ )

– हेमंत मोने

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..