नवीन लेखन...

उमलणारी फुले

चोर पावली येता तुम्हीं,  साव असूनी खऱ्या

फुलराण्या स्वर्गामधल्या,  नाजुक नाजुक पऱ्या

निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे,  संचारी भुमंडळीं

स्वागता रवि उदयाचे,  उमलताती सकाळीं

चाहुल न ये कुणासी,  तुमच्या अगमनाची

प्रफुल्लतेनें मन देते,  पोंच सौंदर्याची

आकर्शक ते रंग निराळे,  खेची फुलपाखरें

मध शोषण्या जमती तेथे,  अनेक भोवरे

सुगंध दरवळून वातावरणीं,  प्रसन्न चित्त करी

जागे करीती जगास,  चैतन्यमय त्या लहरी

हास्यमुखानें समर्पण होती, प्रभूचे चरणावरी

क्षणिक असले जीवन सारे,  सार्थकी लागते तरी.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..