गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप – मनोज इंगळे

गणपती बाप्पा मोरया… म्हटले की एका आनंद जो अखंड दहा दिवस आपल्या मध्ये एक झरा होऊन ओसंडून वाहत असतो. खर तर गणेश हा बुध्दीचा दैवत जाच्या अवती भवती रिधी सिध्दी वास करतात. आपल्यातील एक थोर पुरुष जो क्रांतिकार की ज्याला सर्व तळागाळातील लोकांना एकत्रित आणाचे होते ते म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांनी इंग्रजांना तोंड दण्या करिता व सर्व समाज बांधवांना एकत्रित आणण्या करिता हा सार्वजनिक उपक्रम म्हणून या परंपरेची सुरुवात केली.

आज आपण एकविसाव्या शताब्दी आहोत आज आपल्यातील नवीन युगाचा प्रत्यक्ष कीव अप्रत्यक्षपणे आपल्या राहणीमान व आपल्या सन परंपरा वरही प्रभाव पडलेला दिसतोच त्यात आपले बाप्पा कशे काय सुटतील या प्रभावातून पूर्वी गणपती हा गाव म्हणून ओळखले जायचे एका गावात एकच गणपती बसायचा सर्व गाव एकत्रित येऊन उत्सव जल्लोषात साजरा करायचे, पण आज तसे नाही प्रत्येक मंडळाची एक दुसऱ्या पेक्षा आपण किती श्रेष्ठ हे सागण्याची जणू चढाओढाच चाललेली असते.

घराच्या जवळच गणपती बसला होता छान मूर्ती होती शिवाय खूप मोठी, पण सकाळी आरती झाली ना झाली मंडळाच्या मुलांमध्ये भूत संचारायचा मग तो कधी ..मुन्नी बदनाम हुयी ….च्या रुपात नाही तर ब्राझील …. च्या रुपात आणि नंतर तर … चोली के पीछे क्या है ….काय नी ..खलनायक नी झींगाट काय…..डोक्याचा फार भुगा व्हायचा. शिवाय आपण बोललो तर…. काय दादा दहा दिवस पण तुम्ही सहन करू शकत नाही काय उलट उत्तर…शेवटी त्यांना विकत आणून एक गणपती क्या गाण्याची ‘ आधी वंदू तुज मोरया ‘ सीडी आणून दिली मला होणारा त्रास मी सहन करत होतो पण बाजूला म्हातारे जोडपे होते त्यांना खूप त्रास व्हायचा शिवाय रात्री लहान चेल्ली पाल्ली नवती झोपत. पण नंतर मात्र त्यांनी तसे ऐकले मलाही आनंद झाला.

आजच्या गणेश उत्सवाचे परिणाम आपल्या बाप्पावर ही झाले. बाप्पाची उंची दिवसे दिवस वाढत चालली आहे नंतर मग विसर्जनाचे प्रश्न उद्भवतात आणि आपण बाप्पाचा मग पदोपदी अपमान करतो. आजच्या युगात बाप्पाच्या अवतीभवती असणारी साधीसुधी रंगबिरंगी पताका ची जागा गेली आणि मुजिकल लायटिंग, झेंडे, थर्मोकॉल, डिजे,मोठी स्टेज यांनी नुस्त बाप्पाच्या अवतीभवती ची रेलचेल वाढली आणि त्यामुळे सामाजिक बांधिलकीचे रूप असणाऱ्या उत्सवात राजकारणी, आणि व्यावसायिक पणाचे गालबोट लागत गेले.

यावर्षी अमेझॉन जंगलात आग लागली जगातील ९ देशाला मिळून हे जंगल पसरलेली आहे व आपल्या पृथ्वी वरील १/४ ऑक्सीज हा या जंगलातून येतो असं वाचले होते. सर्व जग या चिंतेत आहे की यामुळे जर ग्लोबल वॉर्मिग मध्ये का या वर्षी ३% नी वाढ झाली तर समुद्रालगत असणारे शहरे हे जलमय होणार त्यात मुंबई, कलकात्ता, शिवाय चीन चे शांघाय, जपान चे टोकियो हे पण आहे तेव्हा आपण एवढे विशाल मुर्त्यांची आरास उभ्या करून काय सिद्ध करू इच्छितो आहे. आपण ही मोठेपणा मध्ये व चढाओढीत न जाता पर्यावरण पूरक अश्या बाप्पाच्या मूर्त्यांची निर्मिती केली पाहिजे.माझाच एक मित्र जो मूर्तिकार आहे त्याला विचारले असता तो म्हणत होता की त्यांना ही प्लास्टर ऑफ पॅरिस क्या मुर्त्या बनवण्याची ओढ नाही पण पीओपी काही सरकार बंद करत नाही, नाहीतर मातीच्या छोट्या मुर्त्यानही भरपूर किंमत मिळणार. पण आपण ही मोठ्या मुर्त्यांचा अट्टाहास करू नये.

गोव्यातील एक गणपती हा केळ्या पासून व बांबू पासून बनविल्या जातो शिवाय त्यातील केळी ही देहा दिवसात पिकतात. पिकल्यावर तीच केळी ही गोरगरिबांना वाटून दिली जातात. पाहा असे काही जमले तर पर्यावरणाचा मित्र होण्याचा प्रयत्न करून.

मग सर्वच लोक जरूर म्हणतील की गणपती बाप्पा मोरया …. पुढच्या वर्षी लवकर या…..

— मनोज इंगळे ( अश्वमेध)

या लेखात काही चुका झाल्या असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो आणि कुणाच्या ही भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो.

प्रयत्न फक्त पर्यावरण वाचवून सन साजरे करणे एवढाच.
गणपती बाप्पा मोरया….

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुपवरील लेखक 58 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…